व्हा तयार! कमी किंमतीत येतेय TVS ची 125CC ची जबरदस्त बाईक; 'या' दिवशी होणार लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 02:52 PM2021-09-14T14:52:32+5:302021-09-14T14:54:11+5:30

कंपनीनं जारी केला टीझर. पाहा काय आहे खास आणि कधी होणार लाँच.

tvs 125cc cheapest sport bike raider retron or fiero teased ahead of launch price features details | व्हा तयार! कमी किंमतीत येतेय TVS ची 125CC ची जबरदस्त बाईक; 'या' दिवशी होणार लाँच

व्हा तयार! कमी किंमतीत येतेय TVS ची 125CC ची जबरदस्त बाईक; 'या' दिवशी होणार लाँच

Next
ठळक मुद्देकंपनीनं जारी केला टीझर. पाहा काय आहे खास आणि कधी होणार लाँच.

देशातील प्रमुख दुचाकी उत्पादक टीव्हीएस मोटर कंपनी देशांतर्गत बाजारपेठेत आपला वाहन पोर्टफोलिओ अपडेट करत नवीन बाईक बाजारात आणण्याची तयारी करत आहे. कंपनीने अलीकडेच या नवीन आगामी बाईकचा एक टीझर व्हिडीओ देखील जारी केला आहे, त्यानुसार ही बाईक 16 सप्टेंबर रोजी लाँच केली जाणार आहे. 

दरम्यान ही बाईक 125CC असेल असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. तसंच या बाईकचं नाव Rider, Retron किंवा Fiero असं असू शकतं असाही दावा करण्यात येत आहे. कंपनीनं या बाईकचा एक छोटा टीझर लाँच केला आहे. टीझरमध्ये या बाईकची छोटी झलकही पाहायला मिळाली आहे. ही बाईक कशी असेल हे पाहण्यासाठी ती अधिकृतरित्या लाँच होण्याची वाट पाहावी लागेल. या बाईकचं डिझाईन अतिशय आकर्षक आणि स्पोर्टी आहे. तसंच याचं लूक आपाचे सीरिजपासून प्रेरित वाटत आहे. यामध्ये ट्रिपल LED बीम, सी शेप टाईम रनिंग लाईट्स, फुल्ली डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, स्लीक LED टर्न सिग्नलही देण्यात येत आहेत.

काय आहे खास?
कंपनीनं जारी केलेल्या टीझरनुसार यामध्ये बुमरँग सेप LED टेललँप, ब्लॅक फ्युअल टँक एक्सटेन्शन, TVS चा 3D हॉर्स लोगो, सिंगल ग्रॅब रेल, स्प्लिट सीट, स्कल्प्ड साईड पॅनल्स, सिंगल चॅनल अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), अलॉय व्हिल्सही देण्यात आले आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार यामध्ये 125CC फ्युअल इंजेक्टेड सिंग सिलिंडर असलेलं इंजिन देण्यात येणार आहे. हे इंजिन 12Ps ची पॉवर आणि 11Nm चा टॉर्क जनरेट करतो. तसंच हे इंजिन 5 स्पीड गिअरबॉक्ससह येतं. दरम्यान, कंपनीनं या बाईकच्या किंमतीबाबत माहिती दिलेली नाही, परंतु ही बाईक कमी किंमतीत लाँच होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Title: tvs 125cc cheapest sport bike raider retron or fiero teased ahead of launch price features details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app