अर्ध्या तासांत 80 टक्के चार्ज, 500Kms ची रेंज; Toyota नं लाँच केली Electric SUV; पाहा फीचर्स 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 04:49 PM2021-10-30T16:49:02+5:302021-10-30T16:49:24+5:30

Toyota Electric Car launch :  कंपनीनं नुकतीच लाँच केली आपली पहिली इलेक्ट्रीक कार Toyota bZ4X.

Toyotas new electric car SUV has a solar roof and a steering yoke like Tesla | अर्ध्या तासांत 80 टक्के चार्ज, 500Kms ची रेंज; Toyota नं लाँच केली Electric SUV; पाहा फीचर्स 

अर्ध्या तासांत 80 टक्के चार्ज, 500Kms ची रेंज; Toyota नं लाँच केली Electric SUV; पाहा फीचर्स 

Next

टोयोटाने नुकतीच त्यांची पहिली ऑल-इलेक्ट्रीक SUV Toyota bZ4X सादर केली. विशेष बाब म्हणजे ही SUV 500 किमी पर्यंतच्या रेंजसह येते आणि अर्ध्या तासात 80 टक्के चार्जही होते. हे कंपनीचे bZ सीरिजचे पहिलेच मॉडेल आहे. पुढील कालावधीत कंपनी आणखीही मॉडेल्स लाँच करणार आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार bZ चा अर्थ beyond Zero असा असून तो कार्बन न्यूट्रॅलिटीकडे टोयोटाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित करतो. 

या इलेक्ट्रीक एसयूव्हीचा प्लॅटफॉर्म कंपनीने जपानच्या सुबारू कॉर्पोरेशनच्या सहकार्याने विकसित केला आहे. हे प्लॅटफॉर्म इलेक्ट्रीक SUV ला ऑफ-रोडिंग कार्यक्षमतेची क्षमता देखील देते. आपल्याला एक असं इलेक्ट्रीक वाहन विकसित करायचं आहे जे अनेक वर्षांपर्यंत विशेषकरून थंडीच्या महिन्यांमध्ये सुरक्षितरित्या चालवलं जाऊ शकतं. या शिवाय ते टॉप क्लास कॅपॅसिटीसोबत येत असेल, असं टोयोटानं सांगितलं.

500KM ची रेंज
नव्या EV मध्ये 71.4 kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. रेंजच्या बाबतीत सांगायचं झालं तर या कारचं फ्रंट-व्हील-ड्राइव्ह व्हर्जन 500 किमी देते आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह व्हर्जन 460 किमीची रेंज देते, असा दावा टोयोटाने केला आहे. पहिलं व्हर्जन 150 kW मोटरला सपोर्ट करते, तर दुसऱ्या मॉडेलवर प्रत्येक एक्सलवर 80 kW मोटर्स बसवलेल्या आहेत. ही कार सर्व हाय आऊटपूट चार्जर्सला सपोर्ट करत असल्याचेही कंपनीने सांगितले आहे. 150 किलोवॅट डायरेक्ट करंट क्षमतेसह 30 मिनिटांत ही कार 80 टक्के चार्ज करता येते.

डिझाईनच्या बाबतीत, Toyota bZX4 EV ही मीडियम साईज SUV आहे. ही एसयुव्ही मॉडर्न एक्सटिरिअरसह येते. इंटिरिअरबद्दल सांगायचं झालं तर नॉर्मल स्टेअरिंग आणि विंग शेप स्टेअरिंगमधून कोणतंही एक निवडण्याचा पर्यायही मिळतो. यामुळे ड्राईव्ह करताना चांगला अनुभव मिळतो असा दावा कंपनीनं केला आहे. कंपनी 2025 पर्यंत bZ सीरिजमधील आणखी 7 मॉडेल आणू शकते.

Web Title: Toyotas new electric car SUV has a solar roof and a steering yoke like Tesla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.