Tata Nexon EV Fire : टाटा नेक्सॉन ईलेक्ट्रीकनंही घेतला पेट; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, म्हटलं…

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 05:13 PM2022-06-23T17:13:10+5:302022-06-23T17:14:19+5:30

गेल्या काही महिन्यांपासून ईलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना घडत असताना आता ईव्ही कारला देखील आग लागल्याची घटना घडली आहे.

tata motors first statement on nexon ev fire incident know what compnay said see video | Tata Nexon EV Fire : टाटा नेक्सॉन ईलेक्ट्रीकनंही घेतला पेट; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, म्हटलं…

Tata Nexon EV Fire : टाटा नेक्सॉन ईलेक्ट्रीकनंही घेतला पेट; कंपनीनं दिलं स्पष्टीकरण, म्हटलं…

googlenewsNext

गेल्या काही महिन्यांपासून ईलेक्ट्रीक स्कूटरना आगी लागण्याच्या घटना घडत असताना आता ईव्ही कारला देखील आग लागल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे टाटा नेक्सॉन ईव्हीला आग लागली आहे. मुंबईनजीकच्या वसईटमध्ये ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर आता कंपनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

सध्या पावसाचे दिवस आहेत. वसईतील एका रेस्ट़ॉरंटबाहेर टाटा नेक्सॉन ईव्ही उभी होती. यावेळी नेक्स़ॉनच्या खालच्या भागात जिथे बॅटरी ठेवलेल्या असतात तिथे आग लागली. लागलीच पोलीस आणि अग्निशमन दलाने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. यावर प्रतिक्रिया देत कंपनीनं आपण या घटनेचा तपास करत असल्याचं सांगितलं.


टाटा मोटर्सने एका निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच लागलेल्या वाहनाला लागलेल्या आगीशी संबंधित घटनेचे तथ्य शोधण्यासाठी आम्ही सखोल तपास करत आहोत. आमची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच आम्ही यासंदर्भात सविस्तर माहिती देऊ. सध्या टाटा नेक्सॉनला लागलेल्या आगीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आम्ही आमच्या वाहनांच्या आणि ग्राहकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध आहोत, असे कंपनीने म्हटले आहे. सुमारे चार वर्षांतील ही पहिलीच घटना असल्याचंही कंपनीनं म्हटलं आहे. या कालावधीत 30,000 हून अधिक इलेक्ट्रीक वाहनांनी एकत्रितपणे देशभरात 100 मिलियन किलोमीटरहून अधिक अंतर कापलं आहे.

यावर ओला ईलेक्ट्रीकचे मालक भाविश अग्रवाल यांनी प्रतिक्रिया दिली असून कोणत्याही कंपनीच्या ईव्हींना आग लागू शकते. जागतिक दर्जाच्या उत्पादनांनाही आगी लागल्या आहेत. परंतु आयसीई पेक्षा इहींना आगी लागण्याचे प्रमाण कमी आहे. असे म्हटले आहे. ओलाच्या स्कूटरला आग लागल्यामुळे अग्रवाल कमालीचे ट्रोल झाले होते. आता टाटाच्या ईव्ही कारला आग लागल्याने अग्रवाल यांना बाजू मांडण्याची संधी मिळाली आहे. 

Web Title: tata motors first statement on nexon ev fire incident know what compnay said see video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.