धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2025 10:24 IST2025-12-07T10:23:50+5:302025-12-07T10:24:15+5:30
Hyundai Grand i10 nios Safety Rating: दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेसाठी चाचणी केलेल्या मॉडेलचे असले तरी, यामुळे भारतीय ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे.

धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग
भारतात बनवलेल्या Hyundai Grand i10 च्या सुरक्षिततेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ग्लोबल NCAP ने केलेल्या क्रॅश टेस्टमध्ये या हॅचबॅक कारला 'प्रौढ प्रवासी संरक्षणा' मध्ये शून्य स्टार रेटिंग मिळाली आहे. हे निकाल दक्षिण आफ्रिकेच्या बाजारपेठेसाठी चाचणी केलेल्या मॉडेलचे असले तरी, यामुळे भारतीय ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता वाढली आहे.
प्रौढ सुरक्षेत 'शून्य' गुण
रेटिंग: GNCAP क्रॅश टेस्टमध्ये Hyundai Grand i10 ने प्रौढ सुरक्षा श्रेणीत ३४ पैकी शून्य (0) गुण मिळवले आहेत.
कमजोर सुरक्षा: चाचणीदरम्यान चालकाच्या छातीची सुरक्षा अत्यंत कमकुवत आढळली. तसेच, डॅशबोर्डच्या अस्थिर रचनेमुळे चालक आणि समोरील प्रवाशाच्या गुडघ्यांना दुखापत होण्याचा धोका असल्याचे दिसून आले.
कारणीभूत घटक: सर्व सीटवर ३-पॉइंट सीटबेल्ट नसणे, तसेच 'साइड हेड प्रोटेक्शन' यांसारख्या आवश्यक सुरक्षा उपकरणांची कमतरता, यामुळे प्रौढ सुरक्षेत कारला ही अत्यंत कमी रेटिंग मिळाली आहे.
बाल सुरक्षेत दिलासादायक कामगिरी
प्रौढ सुरक्षेतील निराशाजनक कामगिरीनंतरही, 'Hyundai Grand i10' ने बाल प्रवासी संरक्षणा' मध्ये मात्र दिलासा दिला आहे. कारला बाल सुरक्षेत ४९ पैकी २८.२८ गुणांसह तीन स्टार रेटिंग मिळाली आहे. १८ महिने आणि ३ वर्षांच्या मुलांसाठी वापरण्यात आलेल्या 'मागे तोंड असलेल्या' बाल सीटने frontal आणि side impact टेस्टमध्ये चांगले संरक्षण दिले.