Saudi Aramco beats Apple Inc: सौदीच्या 'राजाने' अ‍ॅपलचा मुकुट हिसकावला! बनली जगातील नंबर एकची कंपनी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 11:52 AM2022-05-12T11:52:11+5:302022-05-12T11:52:32+5:30

अ‍ॅपलचे पहिल्या तिमाहीत प्रदर्शन चांगले असले तरी दुसऱ्या तिमाहीत चीनमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने आणि पुरवठ्यावर परिणाम झाल्याने त्याचा फटका बसणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Saudi Aramco beats Apple Inc: Saudi Aramco Becomes World’s Most Valuable Stock as Apple Drops | Saudi Aramco beats Apple Inc: सौदीच्या 'राजाने' अ‍ॅपलचा मुकुट हिसकावला! बनली जगातील नंबर एकची कंपनी

Saudi Aramco beats Apple Inc: सौदीच्या 'राजाने' अ‍ॅपलचा मुकुट हिसकावला! बनली जगातील नंबर एकची कंपनी

googlenewsNext

आयफोन बनविणारी जगप्रसिद्ध कंपनी अ‍ॅपल आता जगातील सर्वात श्रीमंत कंपनी राहिलेली नाही. सौदीच्या 'राजाने' अ‍ॅपलचा हा मुकुट हिसकावला असून जगातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. सौदी अरामकोने अ‍ॅपल कडून हा नंबर खेचून आणला आहे.

सौदी अरबची ही कंपनी असून जगातील सर्वात मोठी तेल उत्पादन करणारी ही कंपनी आहे. युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचा फायदा आणि टेक कंपन्यांच्या शेअर्सची घसरलेली मागणी याचा थेट फायदा सौदीच्या या कंपनीला झाला आहे. बुधवारी बंद झालेल्या बाजारामुल्यानुसार सौदी अरामकोचे बाजारमुल्य 2.42 लाख कोटी डॉलर होते तर अ‍ॅपलचे बाजारमुल्य 2.37 लाख कोटी डॉलर होते.

या वर्षाच्या सुरुवातीला अ‍ॅपलचे बाजारमुल्य तीन लाख कोटी डॉलरवर गेली होती. अरामको तेव्हा एक लाख कोटी डॉलर मागे होती. या चार महिन्यांच्या काळात अॅपलच्या शेअरमध्ये २० टक्के घसरण झाली आणि अरामकोच्या शेअरमध्ये २८ टक्क्यांची वाढ झाली. असे असले तरी अ‍ॅपल अमेरिकेत एक नंबरलाच आहे. तर मायक्रोसॉफ्ट १.९५ लाख कोटी डॉलर बाजारमुल्यासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अ‍ॅपलचे पहिल्या तिमाहीत प्रदर्शन चांगले असले तरी दुसऱ्या तिमाहीत चीनमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्याने आणि पुरवठ्यावर परिणाम झाल्याने त्याचा फटका बसणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

दुसरीकडे सौदी अरामकोचा निव्वळ नफा हा गेल्यावर्षी १२४ टक्क्यांनी वाढला आहे. २०२० मध्ये हा नफा ४९ अब्ज डॉलर एवढा होता. २०२१ मध्ये ११० अब्ज डॉलर नफा झाला होता. तेलाच्या किंमती वाढल्या असल्या तरी महागाई वाढल्याने कच्च्या तेलाची मागणी घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच पुरवठ्यावर परिणाम झाल्याने टेक कंपन्यांच्या शेअरवरही दबाव असणार आहे. 

Web Title: Saudi Aramco beats Apple Inc: Saudi Aramco Becomes World’s Most Valuable Stock as Apple Drops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.