'या' कंपनीचा बाजारात बोलबाला; २५ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 02:09 PM2021-09-28T14:09:18+5:302021-09-28T14:09:45+5:30

Electric Vehicles : सध्या भारतीय बाजारपेठेत Electric vehicles ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

pure ev sold 25000 electric scooters sold in 18 months | 'या' कंपनीचा बाजारात बोलबाला; २५ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री

'या' कंपनीचा बाजारात बोलबाला; २५ हजारांपेक्षा अधिक Electric Scooters ची विक्री

Next
ठळक मुद्दे सध्या भारतीय बाजारपेठेत Electric vehicles ची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रीक वाहनांची (Electric Vehicles) मागणी झपाट्याने वाढत आहे, विशेषत: दुचाकी विभागात ग्राहक अधिक स्वारस्य दाखवत आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, अनेक दिग्गज खेळाडूंनी Electric वाहनांच्या उत्पादनात प्रवेश केला आणि आपली नवीन मॉडेल्स सादर केले. पण हैदराबाद स्थित स्टार्टअप Pure EV ने ग्राहकांमध्ये आपली पकड फारच कमी वेळात मजबूत केली आहे.

ExpressDrive मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, Pure Ev ने सुमारे 18 महिन्यांपूर्वी आपले प्रमुख मॉडेल ePluto7G लाँच केले. तेव्हापासून कंपनीने देशभरात 25,000 हून अधिक इलेक्ट्रीक स्कूटर्सची विक्री केली आहे. देशभरात 100 हून अधिक आऊटलेट्ससह कंपनीने इयर टू इयर सेल्समध्ये 600 टक्के विक्री वाढ नोंदवली आहे. जर तुम्ही Pure EV च्या व्हेईकल पोर्टफोलिओकडे पाहिलं तर ePluto 7G ही कंपनीच्या बेस्ट सेलिंग मॉडेल पैकी एक आहे. ही इलेक्ट्रीक स्कूटर सिंगल चार्जमध्ये 120 किमीपर्यंत जात असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

तसंच याचा टॉप स्पीड 60 किमी प्रति तास आहे. अन्य मॉडेल्समध्ये ETrance+ देखील सामील आहे. यामध्ये कंपनीनं 1.8 kWh क्षमतेचं पोर्टेबल बॅटरी पॅक दिलं आहे. ही स्कूटर 65 किमीची रेंज देते. याचं लाँग रेंज मॉडेल निओ 120 किमीची रेंज देते. 

Web Title: pure ev sold 25000 electric scooters sold in 18 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.