जुन्या वाहनांची होणार डोकेदुखी, नूतनीकरण आठ पट महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 02:19 AM2021-03-19T02:19:04+5:302021-03-19T06:42:43+5:30

जुने वाहन भंगारात काढल्यास नवीन वाहनाच्या खरेदीत ५ टक्के सवलत देण्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले आहे. यापुढे जुने वाहन चालविणे महाग हाेणार आहे. राेड टॅक्समध्ये खासगी वाहनांना २५ टक्के, तर व्यावसायिक वाहनांना १५ टक्के सवलत देण्यासही गडकरींनी सुचविले आहे. 

Older vehicles will have headaches, renewal will be eight times more expensive | जुन्या वाहनांची होणार डोकेदुखी, नूतनीकरण आठ पट महागणार

जुन्या वाहनांची होणार डोकेदुखी, नूतनीकरण आठ पट महागणार

googlenewsNext

नवी दिल्ली : केंद्र सरकार जुन्या वाहनांना रस्त्यांवरून हद्दपार करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. एकीकडे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन भंगार धाेरणाबाबत संसदेमध्ये माहिती दिली. तर दुसरीकडे सरकारने या धाेरणाला पूरक अधिसूचना जारी करून १ ऑक्टाेबरपासून जुन्या वाहनाच्या नाेंदणीच्या नूतनीकरणासाठी शुल्कात माेठी वाढ केली आहे. त्यानुसार नूतनीकरणासाठी सुमारे ८ ते १० पट जास्त रक्कम माेजावी लागणार आहे.  (Older vehicles will have headaches, renewal will be eight times more expensive)

जुने वाहन भंगारात काढल्यास नवीन वाहनाच्या खरेदीत ५ टक्के सवलत देण्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले आहे. यापुढे जुने वाहन चालविणे महाग हाेणार आहे. राेड टॅक्समध्ये खासगी वाहनांना २५ टक्के, तर व्यावसायिक वाहनांना १५ टक्के सवलत देण्यासही गडकरींनी सुचविले आहे. 

टाेलनाके हाेणार हद्दपार
सर्व टाेलनाके हटविण्याबाबत सरकारने याेजना आखल्याचे गडकरी म्हणाले. त्यांनी सांगितले की, जीपीएसवर आधारित टाेलवसुलीची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. जीपीएस यंत्रणेच्या माध्यमातून वाहनांचे छायाचित्र काढण्यात येईल. त्याआधारे वाहनाने महामार्गावर प्रत्यक्ष किती अंतर कापले, यावरून टाेल आकारण्यात येईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

पुनर्नाेंदणी महागडी
व्यावसायिक वाहनांना १५ वर्षांनी, तर खासगी वाहनांना २० वर्षांनी फिटनेस प्रमाणपत्र घेऊन पुनर्नाेंदणी करणे आवश्यक राहणार आहे. पुनर्नाेंदणीचे शुल्क हे वाहनांच्या मूळ नाेंदणीच्या तारखेपासून आकारण्यात येईल.

खासगी वाहनाच्या नाेंदणीचे नूतनीकरण न केल्यास दंड - दरमहा ₹३०० ते ₹५००

व्यावसायिक वाहनांना दरराेज - ₹५० दंड भरावा लागणार आहे. 

व्यावसायिक वाहनांना ८ वर्षांनी दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणे बंधनकारक राहणार आहे. फिटनेसमध्ये फेल हाेणाऱ्या वाहनांची नाेंदणी आपाेआप रद्द हाेणार आहे.
 

Web Title: Older vehicles will have headaches, renewal will be eight times more expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.