Seltos ला टक्कर देण्यासाठी येतेय मारुतीची नवी Vitara Brezza; जाणून घ्या कधी होणार लाँच?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 04:57 PM2021-05-28T16:57:28+5:302021-05-28T16:58:03+5:30

Maruti's new Vitara Brezza : मारुती ब्रेझामध्ये सध्या 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103 bhp ताकद आणि 138 Nm टॉर्क तयार करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शन देण्यात आला आहे.

Maruti's new Vitara Brezza facelift to launch in October; Suzuki preparing to fight Kia Seltos | Seltos ला टक्कर देण्यासाठी येतेय मारुतीची नवी Vitara Brezza; जाणून घ्या कधी होणार लाँच?

Seltos ला टक्कर देण्यासाठी येतेय मारुतीची नवी Vitara Brezza; जाणून घ्या कधी होणार लाँच?

googlenewsNext

जपानची ऑटोमोबाईल कंपनी सुझुकी (Suzuki) तिची जबरदस्त पॉप्युलर असलेली कॉम्पॅक्ट एसयुव्ही व्हिटारा (SUV Vitara) एसयुव्हीला फिनिशिंग टच देत आहे. कारचे नवीन मॉडेल अनेक मोठमोठे बदल करून बाजारात येणार आहे. यामध्ये नेक्स्ट जनरेशन मॉडेलची भारतातही वाट पाहिली जात आहे. या Vitara Brezza बाबत नवीन माहिती समोर येत आहे. (Maruti Suzuki is reportedly working on multiple new SUVs for the Indian market.)


व्हिटाला ब्रेझा ऑक्टोबरमध्ये लाँच केली जाणार आहे. तसेच या कारचा ग्लोबल सेल या वर्षाच्या शेवटी किंवा 2022 मध्ये सुरु होणार आहे. जागतिक बाजारात या कारची टक्कर Kia Seltos, Hyundai Kona, Toyota C-HR सारख्या कारसोबत होणार आहे. व्हिटारासह कंपनी एकूण तीन मॉडेल्स या वर्षी युरोपच्या बाजारात लाँच करणार आहे. 


मारुती ब्रेझामध्ये सध्या 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 103 bhp ताकद आणि 138 Nm टॉर्क तयार करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा ऑप्शन देण्यात आला आहे. ऑटोमॅटीक गिअरबॉक्सच्या व्हेरिअंटमध्ये मारुतीची स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. मॅन्युअल गिअरबॉक्सच्या व्हेरिअंटचे मायलेज  माइलेज 17.03 किलोमीटर तर स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीसोबतच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 18.76 किमी प्रति लीटरचे मायलेज मिळते. 


फेसलिफ्टमध्ये काय असेल?
केबिनवर बोलायचे झाले तर ब्रेझाच्या फेसलिफ्टमध्ये रिवाइज्ड अपहोल्स्ट्री, लेदर फिनिश स्टिअरिंग व्हील आणि नवीन 7 इंचाचा स्मार्ट प्ले स्टुडिओ इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आला आहे. या इन्फोटेन्मेंट सिस्टिममध्ये आता लाईव्ह ट्रॅफिक अपडेट, व्हॉईस रेकग्निशन, व्हेईकल अलर्ट आणि क्युरेटेड ऑनलाईन कंटेंट सारख्या सुविधा मिळतात. सोबतच इन्फोटेन्मेंट सिस्टिम अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले देखील सपोर्ट करते. 
 

Web Title: Maruti's new Vitara Brezza facelift to launch in October; Suzuki preparing to fight Kia Seltos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.