Maruti Swift Micro SUV: आता मारुतीच 'पंच' देणार; छोट्याशा स्विफ्टची SUV आणणार, कधी होणार लाँच?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 07:50 PM2021-11-25T19:50:04+5:302021-11-25T19:53:00+5:30

Maruti Swift Micro SUV: नवी Suzuki Swift कार 2022 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर Swift Sport एसयुव्ही म्हणून अप्पर लाईट क्लास एसयुव्हीमध्ये लाँच केली जाईल. 

Maruti Swift Micro SUV: Suzuki will bring a small Swift SUV, when will it be launched? | Maruti Swift Micro SUV: आता मारुतीच 'पंच' देणार; छोट्याशा स्विफ्टची SUV आणणार, कधी होणार लाँच?

Maruti Swift Micro SUV: आता मारुतीच 'पंच' देणार; छोट्याशा स्विफ्टची SUV आणणार, कधी होणार लाँच?

Next

जपानची दिग्गज वाहन निर्माता कंपनी Suzuki (सुजुकी) जबरदस्त हॅचबॅक कार Swift (स्विफ्ट) चे नेक्स्ट जनरेशन मॉडेल तयार करत आहे. याची सुरुवातीची माहिती समोर आली आहे. ही नवी Suzuki Swift कार 2022 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. तर त्याहून अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे Swift Sport व्हर्जनही 2023 पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात आणण्याची शक्यता आहे. 

काही मीडिया रिपोर्टनुसार सुझुकी पुढील पीढीच्या स्विफ्टसोबत त्यावर आधारित छोटी एसयुव्ही देखील लाँच करण्याची योजना बनवत आहे. नवीन स्विफ्टवर आधारित ही टाटा पंचला टक्कर देऊ शकणारी छोटी एसयुव्ही 2024 मध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. जपानच्या बाजारात ही कार Swift Sport एसयुव्ही म्हणून अप्पर लाईट क्लास एसयुव्हीमध्ये लाँच केली जाईल. 

नवीन स्विफ्ट आधारित SUV मध्ये 48V माइल्ड हाइब्रिड सिस्टिमसह 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळू शकते. सध्या, 1.4-लिटर टर्बो इंजिन 129 bhp पॉवर आणि 235 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन नवीन स्विफ्ट स्पोर्ट आणि आंतरराष्ट्रीय-स्पेक सुझुकी जिम्नी 5-डोर व्हेरियंटमध्ये देखील वापरले जाईल.

विशेष म्हणजे, मारुती सुझुकी बलेनो हॅचबॅकवर आधारित कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर देखील तयार करत आहे. हे मॉडेल Nexon च्या खाली लाँच केले जाईल. नवीन SUV ला YTB असे कोडनेम देण्यात आले आहे. हे कंपनीच्या Heartect प्लॅटफॉर्मवर डिझाइन केले जाईल, जे अल्ट्रा आणि प्रगत उच्च तन्य स्टीलपासून बनविलेले आहे.

संबंधित बातम्या...

Suzuki S-Cross: मारुतीची नवी S-Cross पाहून व्हाल गपगार; लूक शानदार, किंमतही वजनदार

Kia Niro Electric SUV: तुम्हाला हवी तेव्हा इलेक्ट्रीक, नको तेव्हा हायब्रिड! Kia ने सादर केली जादूगर एसयुव्ही

Web Title: Maruti Swift Micro SUV: Suzuki will bring a small Swift SUV, when will it be launched?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app