Hyundai launches AURA compact sedan; price tag 5.79 lakhs onwords | Hyundai AURA लाँच; किंमत 5.79 लाखांपासून सुरू

Hyundai AURA लाँच; किंमत 5.79 लाखांपासून सुरू

ठळक मुद्देकेबीन ड्युअल टोन रंगात असून मोठी 8.0 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे.या कारमध्ये तीन प्रकारचे इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन असणार आहे.

ह्युंदाईने एक्ससेंटच्या जागी नवीन कॉम्पॅक्ट सेदान कार AURA लाँच केली आहे. नवीन डिझाईन, रंग आणि वायरलेस चार्जर सारख्या अद्ययावर सुविधा या कारमध्ये देण्यात आल्या आहेत. 


ह्युंदाईच्या ऑरामध्ये ड्रायव्हर रिअर व्ह्यू म़ॉनिटर, लेदरचा गिअर नॉब, इको कोटींग, इमरजन्सी स्टॉप सिग्नल, एअर कर्टन आदी देण्यात आले आहे. 


केबीन ड्युअल टोन रंगात असून मोठी 8.0 इंचाची इन्फोटेन्मेंट सिस्टिम देण्यात आली आहे. यामध्ये अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले आहे. रिअर सीट आर्मरेस्टही देण्यात आला आहे. 5.3 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, क्रूझ कंट्रोल, अॅटो क्लायमेट कंट्रोल, रिअर एसी व्हेंट, आरकिम्सचे 4 स्पीकर म्युझिक सिस्टिम आणि किलेस एन्ट्री अशा सुविधा देण्यात आल्या आहेत यापैकी बऱीच फिचर या सेगमेंटमध्ये पहिल्यादाच आली आहेत. 


ह्युंदाईची ही नवीन कार फेअरी रेड, पोलर व्हाईट, टायफून सिल्व्हर, टायटन ग्रे, अल्फा ब्ल्यू आणि व्हिंटेज ब्राऊन या रंगामध्ये येणार आहे. 

या कारमध्ये तीन प्रकारचे इंजिन पर्याय देण्यात आले आहेत. दोन पेट्रोल आणि एक डिझेल इंजिन असणार आहे. बीएस 6 चे 1.2 लीटर पेट्रोल इंजिन 83 पीएसची ताकद देणार असून 20.5 किमी प्रती लीटरच्या मायलेजचा दावा केला आहे. तसेच 1.0 लीटरचे टर्बो इंजिन देण्यात आले आहे. डिझेलमध्ये 1.2 लीटरचे इंजिन देण्यात आले असून इको टर्बो टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. 

साऱ्या जगाने मानली भारताची चिकाटी; ह्युंदाईच्या या कारने तब्बल 5731 मीटर उंची गाठली

मारुती इको बंद होणार ही अफवाच; नवीन सुरक्षित कार लाँच

Auto Expo 2020: यंदाचा ऑटो एक्स्पो असणार सर्वाधिक लक्षवेधी; तब्बल 70 कार होणार लाँच

पुढे दोन एअरबॅग, एबीएस, ईबीडी, पार्किंग सेन्सर आदी सुरक्षेची फिचर देण्यात आली आहेत. किंमत 5.79 लाखांपासून सुरू होत असून डिझेलचे वरचे मॉडेल 9.22 लाख रुपयांना एक्स शोरूम ठेवण्यात आली आहे. 1.2 लीटरच्या इंजिनामध्ये सीएनजीचा पर्यायही देण्यात आला आहे. 
ही कार मारुती सुझुकीच्या डिझायर, फोर्डच्या अस्पायर, होंडाच्या अमेझला टक्कर देणार आहे. 

Web Title: Hyundai launches AURA compact sedan; price tag 5.79 lakhs onwords

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.