Honda ची 'ही' नवी अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल, कुठल्याही रस्त्यावर बिनधास्त पळवा; अशी आहे खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 10:52 AM2022-05-12T10:52:48+5:302022-05-12T10:53:31+5:30

नवी होंडा NX500 सोबत दमदार इंजिन शिवाय, एक कमी क्षमतेचे इंडिनही दिले जाऊ शकते, असेही डिझाइन फाइलिंगमधून समोर आले आहे.

Honda new nx500 adventure motorcycle revealed in design, easy to ride on any road filing likely to launch soon | Honda ची 'ही' नवी अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल, कुठल्याही रस्त्यावर बिनधास्त पळवा; अशी आहे खासियत

Honda ची 'ही' नवी अ‍ॅडव्हेंचर मोटारसायकल, कुठल्याही रस्त्यावर बिनधास्त पळवा; अशी आहे खासियत

googlenewsNext

होंडाने नुकतीच अगदी नव्या NX500 मिड-साइज अ‍ॅडव्हेंचर बाईकचे डिझाइन फाईल केली आहे. यातून या बाईकचे डिझाइन समोर आले आहे. एवढेच नाही, तर कंपनीने काही दिवसांपूर्वीच NX500 नावही ट्रेडमार्क केले आहे. यावरून कंपनी लवकरच ही नवी अ‍ॅडव्हेंचर बाईक लॉन्च करू शकते, हे स्पष्ट होते. या नव्या होंडा बाईकसग सीबी500एक्सचे 471 सीसी लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन मिळू शकते. जे 47 बीएचपी एवढी शक्ती आणि 43.2 एनएम पीक टॉर्क जनरेट करेल. (Honda NX500 Mid Size Adventure Motorcycle)

कमी क्षमतेचे इंजिनही मिळण्याची शक्यता - 
नवी होंडा NX500 सोबत दमदार इंजिन शिवाय, एक कमी क्षमतेचे इंडिनही दिले जाऊ शकते, असेही डिझाइन फाइलिंगमधून समोर आले आहे. एवढेच नाही तर, या नव्या अ‍ॅडव्हेंचर बाईकला 184.4 सीसीचे सिंगल-सिलिंडर इंजिनही दिले जाऊ शकते. जे भारतात तयार झालेली होंडा सीबी 200एक्स आणि होंडा हॉर्नेट 2.0 ला दिले जाते. गेल्यावर्षी होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियानेही एनएक्स200 नावाने ट्रेडमार्क नोंदवला होता. मात्र, येथे कंपनीने सीबी200एक्स लॉन्च केली.

होंडासाठी मोठी संधी? -
होंडा सीबी200एक्स भारतीय ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहे. मात्र, ऑफ-रोडिंगचा विचार करता, हिचे सस्पेंशन फारसे दमदार नाही. ही बाईक विक्रीतही ठीक-ठाक प्रदर्शन करत आहे. भारतात एंट्री लेव्हल अ‍ॅडव्हेंचर बाईक्स अत्यंत पसंत केल्या जात आहेत. यात हिरो एक्सपल्स 200 4V चाही समावेश आहे. अशात होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियासाठी या सेगमेंटची विक्री वाढवीण्याची सुवर्णसंधी असू शकते. 

Web Title: Honda new nx500 adventure motorcycle revealed in design, easy to ride on any road filing likely to launch soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.