Hero will launch two scooters; Alia bhat did Advertise | हिरोच्या दोन स्कूटर होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देणार; आलिया करत होती जाहिरात
हिरोच्या दोन स्कूटर होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देणार; आलिया करत होती जाहिरात

नवी दिल्ली : भारतीय कंपनी हिरो मोटर्स 13 मे रोजी दोन स्कूटर नव्या रुपात लाँच करणार आहे. Maestro Edge 125 आणि Pleasure 110 या स्कूटरचा नव्याने लाँच केल्या जाणार आहेत. माएस्ट्रो एज 125 ला 2018 च्या ऑटो एक्स्पोमध्ये दाखविण्यात आले होते. ही स्कूटर गेल्यावर्षी लाँच झालेल्या हिरोच्या डेस्टीनीवर आधारित आहे. तर प्लेझर 110 चे रुपडे जुन्या स्कूटरपेक्षा खूप वेगळे असणार आहे. 


हिरो माएस्ट्रो एज 125 स्कूटरला डेस्टिनीचे स्पोर्टी मॉडेल समजले जाऊ शकते. यामध्ये युवावर्गाला लक्षात घेऊन बदल करण्यात आले आहेत. या स्कूटरवर शार्प लाईन्स आहेत. तसेच अलॉय व्हील्स आणि युएसबी चार्जिंगची सुविधा मिळणार आहे. स्कूटरमध्ये हिरो i3S स्टार्ट स्टॉप टेक्नॉलॉजी असणार आहे. यामुळे स्कूटरचे मायलेज चांगले असेल. 

Maestro Edge मध्ये 125 सीसीचे इंजिन असेल. हे इंजिन 8.7 बीएचपी ताकद आणि 10.2 एनएम पीक टॉर्क देईल. डिजिटल इन्स्ट्रुमेंटल कन्सोलमध्ये साईड स्टँड इंडिकेटर, सर्व्हिस रिमाईंडरची सुविधा मिळणार आहे. तसेच स्कूटरमध्ये पुढे डिस्क ब्रेक पर्याय असणार आहे. 
नव्या प्लेझरमध्य मोठे बदल होणार आहेत. इंजिनही बदलले जाणार आहे. 110 सीसीचे इंजिन 8.1 एचपीची ताकद आणि 8.7 एनएम टॉर्क तयार करेल.


या स्कूटर होंडाच्या अ‍ॅक्टिव्हाला टक्कर देतील. माएस्ट्रो एज 125 ची किंमत एक्स शोरुम 55 हजार रुपये असण्याची शक्यता आहे. तर प्लेझरची किंमत 45 हजार रुपये असेल. 


Web Title: Hero will launch two scooters; Alia bhat did Advertise
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.