'हार्ले डेव्हिडसन' भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 07:32 PM2020-08-20T19:32:50+5:302020-08-20T19:38:31+5:30

कंपनी भारतातील असेंब्ली प्लांट बंद करण्याचा विचार करीत आहे.

Harley Davidson may exit India as part of global restructuring: Reports | 'हार्ले डेव्हिडसन' भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?

'हार्ले डेव्हिडसन' भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?

Next
ठळक मुद्देहार्ले डेव्हिडसन इंडियाने गेल्या आर्थिक वर्षात २५०० पेक्षा कमी युनिट्स विकल्या आहेत.

मोटारसायकल बनवणारी अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत तयारीत आहे. भारतीय बाजारपेठेत दहा वर्षांपूर्वी पाऊल ठेवलेली कंपनी बाईकची कमी विक्री आणि भविष्यातील मागणी लक्षात घेऊन आता भारतातील असेंब्ली प्लांट बंद करण्याचा विचार करीत आहे. 

यासंदर्भात द हिंदू या वृत्तपत्राने माहिती दिली आहे. यानुसार, अमेरिकेतील प्रसिद्ध मोटारसायकल निर्माता कंपनीने हरियाणामधील बावळ येथे भाड्याने घेतलेल्या असेंब्ली प्लांटच्या वापरासाठी संभाव्य आऊटसोर्सिंग व्यवस्थेसाठी सल्लागारांमार्फत काही ऑटोमोबाइल उत्पादकांना पाठवले आहे.

उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया पॅसिफिकच्या जवळपास काही भागांत कंपनीला जास्त विक्री आणि विकासाची क्षमता दिसत आहे. त्यामुळे ५० बाजारपेठांवर लक्ष्य केंद्रित करून आपल्या पुनर्वापर धोरणानुसार कंपनीचा असेंब्ली बंद करण्याचा निर्णय असल्याचे समजते.
कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याच्या योजनेचे मूल्यांकन करीत आहे, ज्याठिकाणी उत्पादन आणि नफा भविष्यातील रणनीतीच्या अनुषंगाने चालू गुंतवणूकीला समर्थन देत नाही, असे हार्ले डेव्हिडसनने गेल्या दुसऱ्या तिमाहीतील आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

हार्ले डेव्हिडसन इंडियाने गेल्या आर्थिक वर्षात २५०० पेक्षा कमी युनिट्स विकल्या आहेत. जर कंपनीने आपले असेंब्ली प्लांट बंद केले, तर भारतातील ही दुसरी कंपनी असेल. याआधी जनरल मोटर्सने २०१७ मध्ये आपल्या गुजरातच्या प्लांटची विक्री केली होती.
हार्ले-डेव्हिडसन इंडियाने गेल्या आर्थिक वर्षात २५०० पेक्षा कमी युनिट्स विकल्या आणि एप्रिल ते जून २०२० दरम्यान अवघ्या १०० मोटारसायकलची विक्री केली. त्यामुळे आंतरराष्टीय बाजापेठेत कंपनीला भारत सर्वात खराब कामगिरी करणारा ठरला आहे, असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

आणखी बातम्या...

१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार    

आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका    

मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!    

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार    

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया  

Web Title: Harley Davidson may exit India as part of global restructuring: Reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन