मोफत करून घ्या आपल्या गाडीची सर्व्हिसिंग, महिंद्राकडून ग्राहकांना खास संधी, असं करा बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:21 PM2021-02-17T17:21:38+5:302021-02-17T17:23:05+5:30

महत्वाचे म्हणजे, ट्रेंड टेक्नीशियनच्या माध्यमाने ग्राहक प्रत्येक वाहनावरील डिटेल्ड 75-पॉइंट चेकचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय महिंद्राकडून ग्राहकांना वाहनांच्या सुट्या भागांवर 5 टक्के, लेबरवर चार्जवर 10 टक्के तर मॅक्सिकेयर ट्रिटमेंटवर 25 टक्क्यांची सूट मिळणार आहे. (Mahindra m plus mega service campaign )

Get car serviced for free mahindra m plus mega service campaign across India booking with whatsapp | मोफत करून घ्या आपल्या गाडीची सर्व्हिसिंग, महिंद्राकडून ग्राहकांना खास संधी, असं करा बुकिंग

मोफत करून घ्या आपल्या गाडीची सर्व्हिसिंग, महिंद्राकडून ग्राहकांना खास संधी, असं करा बुकिंग

Next

मुंबई : महिंद्रा (Mahindra) कंपनीकडून आपल्या ग्राहकांसाठी देशभरात फ्री मेगा सर्व्हिस कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. यात, महिंद्राच्या बोलेरो (Bolero), स्कॉर्पियो (Scorpio), XUV500, Marazzo, Alturas G4, XUV300 TUV300, KUV100, Xylo, Nuvosport, Quanto, Verito, Verito Vibe, लोगन (logan), रेक्सटन (Rexton) आणि थार (Thar) या गाड्यांचा समावेश आहे. (Get car serviced for free mahindra m plus mega service campaign booking with whatsapp)

महिंद्रा कंपनीचा एम-प्लस मेगा सर्व्हिस कॅम्प हा देशभरातील सर्व प्रमुख शहरांमध्ये एकूण 600 अथोराइज्ड वर्कशॉप्समध्ये 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत सुरू असेल. या उपक्रमामुळे महिंद्रा वाहनधारकांना त्यांच्या वाहनांची स्थिती जाणून घेता येईल.

महत्वाचे म्हणजे, ट्रेंड टेक्नीशियनच्या माध्यमाने ग्राहक प्रत्येक वाहनावरील डिटेल्ड 75-पॉइंट चेकचा लाभ घेऊ शकतात. याशिवाय महिंद्राकडून ग्राहकांना वाहनांच्या सुट्या भागांवर 5 टक्के, लेबरवर चार्जवर 10 टक्के तर मॅक्सिकेयर ट्रिटमेंटवर 25 टक्क्यांची सूट मिळणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे केवळ उद्याचाच दिवस शिल्लक आहे.

WhatsApp वर करा बुकिंग -
ग्राहकांना WhatsApp वर गाडी सर्व्हिसिंगचे बुकिंग करता येईल. ‘महिंद्रा विथ यू हमेशा’ या WhatsApp अकाउंटवर मसेज करून, ‘विथ यू हमेशा’ या अॅपच्या सहाय्याने अथवा महिंद्राच्या वेबसाईटवरून आपल्याला आपल्या गाडीच्या सर्व्हिसिंगचे बुकिंग करता येईल. याच बरोबर आपल्याला ट्रबल फ्री पिक अँड ड्रॉप सर्विसचा लाभ घेण्यासाठी मॅक्सिकेयर ट्रिटमेंट सिलेक्शनसह स्वतःचे जॉब कार्डदेखील तयार करता येईल.

WhatsApp वरच कस्टमर रिपेअर ऑर्डरला अप्रूव्हल दिले जाईल. तसेच ग्राहक त्यांच्या कार सर्व्हिसिंगबाबतची माहिती ट्रॅक करू शकतात. रिपेअर इनव्हॉईस पाहू शकतात तसेच वर्कशॉपमध्ये स्टेशनरी किंवा पीओएस मशीनशिवाय ‘विथ यू हमेशा’ अॅपद्वारे पेमेंटही करु शकतात. 

महिंद्राने “CustomerLIVE” सादर केले आहे. ही एक लाईव्ह व्हिडीओ स्ट्रिमिंग सर्व्हिस आहे, याद्वारे सर्व्हिस अॅडवायझर ग्राहकांना त्यांच्या गाडीच्या रिपेअरिंगबाबत इस्टिमेट सांगू शकतील.
 

Web Title: Get car serviced for free mahindra m plus mega service campaign across India booking with whatsapp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.