फोर्ड फायद्यात येऊनही भारत का सोडतेय? महिंद्रासोबत केला करार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 05:36 PM2019-09-26T17:36:17+5:302019-09-26T17:39:01+5:30

फोर्ड इंडिया ही कंपनी भारतात 20 वर्षांनी फायद्यात आली होती.

is Ford will Exit India like General Moters? signed joint Venture Contract with Mahindra | फोर्ड फायद्यात येऊनही भारत का सोडतेय? महिंद्रासोबत केला करार

फोर्ड फायद्यात येऊनही भारत का सोडतेय? महिंद्रासोबत केला करार

Next

मुंबई : फोर्ड ही जगातील आघाडीच्या वाहन कंपन्यांमध्ये असलेली अमेरिकेची मोठी कंपनी भारतात गेल्या 20 वर्षांपासून जम बसवत होती. एवढी वर्षे झगडून ही कंपनी पहिल्यांदा फायद्यात आली आहे. मात्र, सध्याच्या वाहन उद्योगासमोरील अडचणी, मंदी आणि इलेक्ट्रीक वाहनांसाठी आवश्यक असलेले बदल यामुळे कंपनीने महिंद्रा आणि महिंद्रासोबत करार केला आहे. याची घोषणा पुढील आठवड्यात होईल. यामुळे फोर्ड भारत सोडणार असल्याचे वृत्त कमालीचे व्हायरल झाले आणि एकच खळबळ उडाली. 


फोर्ड इंडिया ही कंपनी भारतात 20 वर्षांनी फायद्यात आली होती. तरीही कंपनीने महिंद्रासोबत सहकार्य करार केला आहे. यामुळे दोन वर्षांपूर्वी जशी आणखी एक अमेरिकन कंपनी जनरल मोटर्सने भारतातून गाशा गुंडाळला तसाच फोर्डही गुंडाळणार असे वृत्त पसरले आहे. फोर्ड इंडियाच्या वाहनांची विक्री घसरत चालली आहे. यामुळे फोर्डला भारतात खूप संघर्ष करावा लागत आहे. ऑगस्टमध्ये कंपनीच्या कारची विक्री 31.4 टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कंपनीने 8042 वाहने विकली होती. यंदा हा आकडा 5517 वर आला आहे. 

काही वृत्तसंस्थांनी फोर्ड भारत सोडणार असल्याचे वृत्त दिले होते. महिंद्राला फोर्ड भारतातील व्यवसाय भागीदारीमध्ये विकणार आहे. यामध्ये 51 टक्के महिंद्राची मालकी असणार आहे. फोर्डने गेल्या 20 वर्षांत 2 अब्ज डॉलर्स भारतात गुंतविले आहेत. तसेच कंपनीचे सानंद आणि चेन्नईमध्ये दोन प्रकल्प आहेत. सानंदच्या प्रकल्प 2015 मध्ये उभारण्यात आला असून यामध्ये वर्षाला 2,40,000 फिगो, अस्पायर या कार बनविण्याची आणि 2,70,000 इंजिनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. या कार 30 देशांमध्ये निर्यात केल्या जातात. तसेच चेन्नईच्या प्रकल्पामध्ये इकोस्पोर्ट आणि एन्डोव्हर या 2 लाख कार आणि 3.4 लाख इंजिने बनविण्याची क्षमता आहे. भारतीय बाजाराची गरज पाहता दोन प्रकल्प कंपनीला डोईजड ठरत आहेत.


या वृत्ताची खातरजमा केली असता फोर्ड भारतीय बाजारातून बाहेर पडण्याच्या विचारात नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सानंदचा प्रकल्पही बंद करण्याचा विचार नसून जगभरातील 30 देशांना मेक इन इंडियाच्या कार निर्यात केल्या जाणार आहेत. फोर्डचे भारतातील ग्राहक पाहता कंपनी त्यांना सेवा देत राहील, असे सांगितले. 

Web Title: is Ford will Exit India like General Moters? signed joint Venture Contract with Mahindra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.