झारखंडच्या इंजिनिअरने कमाल केली; हॉयड्रॉलिकवर पळणारी सायकल बनविली, वेग 82 किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 01:20 PM2021-03-10T13:20:26+5:302021-03-10T13:21:54+5:30

Petrol Diesel Price Hike, techie developed Fuel-Less Hydraulic Bike: हजारीबाग जिल्ह्यातील संतोष कुमार गुप्ता याने हे यश मिळविले आहे. ही हायब्रिड सायकल तब्बल 82 किमी प्रति तासाच्या वेगाने पळते. या सायकलला पळण्यासाठी नाही कोणत्या प्रदूषणकारी इंधनाची गरज भासणार नाही सारखे चार्ज करण्यासाठी विजेची गरज भासणार. 

engineer from Jharkhand Made a hydraulic cycle, speed 82 km | झारखंडच्या इंजिनिअरने कमाल केली; हॉयड्रॉलिकवर पळणारी सायकल बनविली, वेग 82 किमी

झारखंडच्या इंजिनिअरने कमाल केली; हॉयड्रॉलिकवर पळणारी सायकल बनविली, वेग 82 किमी

Next

एकीकडे पेट्रोल, डिझेलच्या दरांनी आकाश गाठलेले (Petrol Diesel Price Hike) असताना तसेच पर्याय म्हणून बाजारात असलेल्या ईलेक्ट्रीक स्कूटर महागड्या ठरत असताना झारखंडच्या इंजिनिअरने कमालीचा शोध लावला आहे. त्याने हॉयड्रॉलिक प्रणालीवर धावणारी सायकल बनविली असून तिचा पेटंटही रजिस्टर केला आहे. (A Jharkhand techie has designed and patented a two-wheeler that runs on a Hydraulic system and can go as high as 82 kmph.)


हजारीबाग जिल्ह्यातील संतोष कुमार गुप्ता याने हे यश मिळविले आहे. ही हायब्रिड सायकल तब्बल 82 किमी प्रति तासाच्या वेगाने पळते. या सायकलला पळण्यासाठी नाही कोणत्या प्रदूषणकारी इंधनाची गरज भासणार नाही सारखे चार्ज करण्यासाठी विजेची गरज भासणार. 
या हायड्रॉलिक सिस्टीमवर जेसीबी सारख्या मशीन काम करतात. त्यांना जी डोंगर पोखरण्याची ताकद मिळते ती हायड्रॉलिक पाईपमध्ये असलेल्या ऑईलमधून जाते. तसाच काहीसा प्रकार यामध्ये वापरण्य़ात आला आहे. पायंडल मारल्य़ावर जी शक्ती तयार होते ती हायड्रोलिक सिलिंडरमधून ऑईलच्या माध्यमातून मागच्या चाकाला मिळणार आहे. म्हणजेच एका ठिकाणी ताकद लावली की ती दुसऱ्या ठिकाणी पोहोच केली जाणार आहे. 


या सिस्टिममुळे सायकलला सारखे सारखे पायंडल मारावे लागणार नाहीत. गुप्ता याने साध्या सायकलची चेन हायड्रॉलिक कॉईलने बदलली आहे. तसेच या सायकलला तीन गिअर आहेत. जास्त पायंडल न मारता सायकल 82 किमी प्रती तासाचा वेग पकडू शकणार आहे, असे गुप्ता याने सांगितले. 
इंधन खर्च आणि पर्यावरण वाचविणाऱ्यांसाठी ही सायकल एक चांगला पर्याय ठरणार आहे. ही सायकल 35000 रुपयांत उपलब्ध होऊ शकेल असे गुप्ता यांने सांगितले. 

2011 मध्ये पदवीधर...
संतोष गुप्ता याने 2011 मध्ये पदवी संपादन केली आहे. तेव्हापासून त्याने नोकरी शोधण्याऐवजी हा सायकल बनविण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला होता. तो शाळेत असल्यापासून बिना इंजिनची आणि इंधनाची बाईक बनविण्याचे स्वप्न पाहत होता. आता त्याचे हे स्पप्न पूर्ण झाले आहे. 

Web Title: engineer from Jharkhand Made a hydraulic cycle, speed 82 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.