Cheapest Electric Cars: केवळ 97 पैशांत 1 किमीचे अंतर; देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार बंपर पैसे वाचविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 05:14 PM2021-11-26T17:14:17+5:302021-11-26T17:15:07+5:30

Cheapest Electric Cars in India: देशात आता इलेक्ट्रीक वाहनांचे युग येण्यास सुरुवात झाली आहे. या कार तशा पेट्रोल, डिझेल कराच्या तुलनेत खरेदीवेळी स्वस्त जरी नसल्या तरी त्या कालांतराने पैसे वाचवू लागतात.

Cheapest Electric Cars: 1km for only 97 paisa; will save more money than Petrol, Diesel Cars | Cheapest Electric Cars: केवळ 97 पैशांत 1 किमीचे अंतर; देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार बंपर पैसे वाचविणार

Cheapest Electric Cars: केवळ 97 पैशांत 1 किमीचे अंतर; देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक कार बंपर पैसे वाचविणार

Next

देशात आता इलेक्ट्रीक वाहनांचे युग येण्यास सुरुवात झाली आहे. या कार तशा पेट्रोल, डिझेल कराच्या तुलनेत खरेदीवेळी स्वस्त जरी नसल्या तरी त्या कालांतराने पैसे वाचवू लागतात. भारतात सध्या इलेक्ट्रीक कारची विक्री (cheapest electric cars) जोर धरू लागली आहे. परंतू ग्राहकांसमोर खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये टाटाच्या दोन कार आणि एमजीची एक चांगला पर्याय ठरत आहे. 

Tata Tigor EV (टाटा टिगोर ईव्ही),Tata Nexon EV (टाटा नेक्सॉन ईव्ही) आणि MG ZS EV (एमजी झेडएस ईव्ही) या त्या तीन कार आहेत. या कार 300 ते 400 किमीची रेंज देतात. यामुळे या कार चालविण्याचा खर्च कमी असतो आणि कमी खर्चात जास्त अंतर कापले जाते. (per kilometer cost on electric vehicle)

Tata Tigor EV मध्ये 26 kWh ची लिथिअम आयन बॅटरी देण्यात आली आहे. जी पूर्ण चार्ज केल्यावर 306 किलोमीटरची रेंज देते. याची इलेक्ट्रीक मोटर 74.7 PS ची ताकद आणि 170 Nm टॉर्क जनरेट करते. 15A च्या रेग्युलर चार्जरद्वारे ही कार 8 तास 45 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. तर 25 kW DC फास्ट चार्जरद्वारे ही कार 65 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. वेगाबाबत बोलायचे झाले तर 5.7 सेकंद 0-60 किलोमीटर प्रति तासाचा वेग पक़डते. याची एक्सशोरुम किंमत 13.14 लाख रुपये आहे. 1 किमीचे अंतर कापण्यासाठी 1 रुपयांचा खर्च येईल. 

Tata Nexon EV मध्ये 30.2 kWh ची लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी लिक्विड कूल्ड आणि IP67 सर्टिफाइड आहे. ही कार सिंगल चार्जवर 312 किलोमीटरची रेंज देते. फास्ट चार्जरवर ही कार 60 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. होम चार्जरवर ही कार 8 तास घेते. या कारची किंमत 13.99 लाख रुपये आहे. 1 किमीसाठी 97 पैशांचा खर्च येतो. 

MG ZS EV मध्ये 44.5 kWh ची बॅटरी वापरण्यात आली आहे. यामध्ये Hi-Tech IP6 सर्टिफाइड बॅटरी आहे. यावर धूळ आणि पाण्याचा परिणाम होत नाही. याची मोटर 141 bhp ताकद निर्माण करते. इलेक्ट्रीक कार 419 km ची रेंज देते. या कारची किंमत 20,99,800 एक्स शोरुम आहे. 1 किमीचे अंतर कापण्यासाठी 97 पैशांचा खर्च येणार आहे. 

Web Title: Cheapest Electric Cars: 1km for only 97 paisa; will save more money than Petrol, Diesel Cars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.