बाबो! बिहारमध्ये पेट्रोल 80 रुपये, डिझेल 70 रुपये लीटर; गोव्यालाही विदेशीने टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 01:03 PM2021-02-20T13:03:17+5:302021-02-20T13:41:24+5:30

Today Petrol Diesel Price in Bihar: बिहारला लागूनच नेपाळ आहे. नेपाळला भारतातूनच पेट्रोलचा सप्लाय होतो. (Nepal and Bihar Petrol Price) भारताच्या तुलनेत नेपाळमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती या कमी आहेत.

Cheap foreign petrol, diesel in Bihar; 15 to 20 rupees lower prices than rest of India | बाबो! बिहारमध्ये पेट्रोल 80 रुपये, डिझेल 70 रुपये लीटर; गोव्यालाही विदेशीने टाकले मागे

बाबो! बिहारमध्ये पेट्रोल 80 रुपये, डिझेल 70 रुपये लीटर; गोव्यालाही विदेशीने टाकले मागे

googlenewsNext

बिहारची राजधानी पटनामध्ये (Today Petrol Diesel Price in Bihar)  आज पेट्रोलचा दर 93.07 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेल 86.37 रुपये आहे. तरीही बिहारमध्ये यापेक्षाही स्वस्त पेट्रोल, डिझेल मिळत आहे. हे विदेशी पेट्रोल 80 रुपये आणि डिझेल 70 रुपयांना मिळत आहे. यामध्ये बिहारने गोव्यालाही मागे टाकले आहे. (Petrol diesel smuggling in Bihar From Nepal.)


बिहारला लागूनच नेपाळ आहे. नेपाळला भारतातूनच पेट्रोलचा सप्लाय होतो. (Nepal and Bihar Petrol Price) भारताच्या तुलनेत नेपाळमध्ये डिझेल आणि पेट्रोलच्या किंमती या कमी आहेत. या किंमती जवळपास 18 रुपयांनी कमी आहेत. यामुळे बिहार-नेपाळच्या सीमेवर मोठी तस्करी होऊ लागली आहे. या आधी थोड्या प्रमाणावर होत होती. परंतू देशात पेट्रोलचे दर पेटल्याने आता बॉर्डरवरील भागात नेपाळचेच इंधन वापरले जात आहे. 

भूतानमध्ये भारतातूनच इंधन जाते, तिथे आपल्यापेक्षा निम्मीच किंमत; काँग्रेस, स्वामींनी भाजपाला घेरले


सीमाभागात राहणारे पल्सर, एफझेडवाले नेपाळमध्ये जाऊन दुचाकीची टाकी फुल करून परतत आहेत. तर कारवाले देखील नेपाळमध्ये जाऊन टाकी फूल करून भारतीय हद्दीत येत पेट्रोल, डिझेलची भारतापेक्षा कमी परंतू नेपाळपेक्षा जास्त दराने विक्री करत आहेत. या काळात या रस्त्यावरील वाहतूक वाढली आहे. 

एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे


याआधी तस्करांच्या टोळ्या पेट्रोल, डिझेल कॅनमध्ये भरून आणत होते. मात्र, सीमेवर ही तस्करी पकडण्यात येऊ लागताच आता तस्करांनी वाहनातच इंधन भरून आणण्याचा प्रकार सुरु केला आहे. रिकामी टाकी करून हे तस्कर नेपाळमध्ये पोहोचत आहेत. दुचाकी, चारचाकीवरून दिवसाला 10-10 फेऱ्या होत आहेत. यामुळे नेपाळच्या पेट्रोलपंप चालकांची तसेच सरकारची चांदी झाली आहे. मागणी वाढल्याने नेपाळनेही भारताकडे जादा पेट्रोल, डिझेलची मागणी केली आहे. 

Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम...


नेपाळमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर किती?
नेपाळची औद्योगिक राजधानी असलेल्या बिराटनगरमध्ये डिझेलची किंमत 100 नेपाळी रुपये आणि पेट्रोल 110 नेपाळी रुपयांना विकले जाते. भारतीय रुपयात हे पेट्रोल 68.75 आणि डिझेल 62.50 रुपये आहे. भारतीय बाजारात बिहारमध्ये जवलपास 18 ते 20 रुपयांचा फरक आहे. यामुळे बिहारच्या बेरोजगारांना या दिवसात मोठा रोजगार मिळाला आहे.  गोव्यात पेट्रोलची किंमत 87.88 रुपये आणि डिझेल 85.06 रुपयांना मिळतेय. तर बिहारमध्ये या नेपाळी इंधनाचा दर यापेक्षाही कमी आहे. 

मॅन्युअल गिअरची कार चालविताना या चुका करू नका; नाहीतर होईल मोठे नुकसान...

 

Web Title: Cheap foreign petrol, diesel in Bihar; 15 to 20 rupees lower prices than rest of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.