मोबाईलसारखी स्कूटर कुठेही चार्ज करा; ओकिनावाने केली लाँच, जाणून घ्या किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 05:11 PM2020-08-24T17:11:37+5:302020-08-24T17:14:19+5:30

कंपनीने लाँचिगसोबतच या स्कूटरची बुकिंगही सुरु केली आहे. यासाठी ग्राहक 2000 रुपये टोकन देऊन स्कूटर बुक करू शकणार आहेत.

Charge a scooter anywhere like a mobile; Okinawa launches, find out the price | मोबाईलसारखी स्कूटर कुठेही चार्ज करा; ओकिनावाने केली लाँच, जाणून घ्या किंमत

मोबाईलसारखी स्कूटर कुठेही चार्ज करा; ओकिनावाने केली लाँच, जाणून घ्या किंमत

Next

इलेक्ट्रीक स्कूटर बनविणारी कंपनी ओकिनावाने भारतीय बाजारात नवीन स्कूटर लाँच केली आहे. यामध्ये ओकिनावाने भारतीयांची चार्जिंगची मुख्य अडचण सोडविली आहे. ओकिनावा R30 आज लाँच करण्यात आली. ही स्लो स्पीड कॅटेगरीमधील स्कूटर आहे. 


या स्कूटरची एक्स शोरुम किंमत 58992 रुपये आहे. कंपनीने लाँचिगसोबतच या स्कूटरची बुकिंगही सुरु केली आहे. यासाठी ग्राहक 2000 रुपये टोकन देऊन स्कूटर बुक करू शकणार आहेत. या स्कूटरचा सर्वाधिक वेग हा 25 किमी प्रति तास आहे. यामुळे तिला लो स्पीड कॅटेगरी देण्यात आली आहे. य़ामध्ये 1.25 किलोवॉटची लिथियम आयनची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी काढून मोबाईलसारखी कुठेही चार्ज करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे घरातील साध्या प्लगवरही ती चार्ज करता येते. 


कंपनीच्या दाव्यानुसार ही बॅटरी 4 ते 5 तासात फुल चार्ज होणार आहे. यानंतर ती एका चार्जिंगमध्ये 60 किमी धावणार आहे. म्हणजेच 2 ते 2.5 तासाच्या चार्जिंगमध्ये ही स्कूटर 30 किमी अंतर कापणार आहे. 
ही बॅटरी चार्ज करण्य़ासाठी 1 तासाला 1 युनिट खर्च होतो. म्हणजेच पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 युनिट वीज लागणार आहे. जर एका युनिटचा खर्च 7 ते 8रुपये आहे तर 5 युनिटसाठी 40 रुपये खर्च होणार आहेत. म्हणजेच 40 रुपयांच्या खर्चात तुम्ही 60 किमी जाऊ शकणार आहात. हिशोब पाहिल्यास एका किमीसाठी 1.5 रुपये खर्च होणार आहेत. 


स्कूटरसोबत मिळणारा चार्जर ऑटो कट फंक्शनचा आहे. तर बॅटरीवर कंपनी 3 वर्षांची वॉरंटी देत आहे. स्कूटरमध्ये वापरण्यात आलेली 250 वॉटची BLDC इलेक्ट्रिक मोटरवर 3 वर्षे किंवा 30000 किमीची वॉरंटी देण्यात येणार आहे. 


फिचर्स
या स्कूटरमध्ये अलॉय व्हील्स, डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. शिवाय़ ही स्कूटर पाच रंगांत व्हाइट, ग्लॉसी व्हाइट, ग्लॉसी रेड, मेटॅलिक ऑरेंज, सी ग्रीन आणि सनराइज यलो  मिळणार आहे. सुरक्षेसाठी यामध्ये ड्रम ब्रेकसोबत ई-एबीएस (इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टम) देण्यात आले आहे. 150 किलोचे वडन ही स्कूटर वाहून नेऊ शकते. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Sushant Singh Rajput case: सुशांतच्या हत्येमागे दोन 'डॅडी'; जिम पार्टनर मित्राचा खळबळजनक आरोप

Video: अंतराळात खळबळ उडाली! पृथ्वीवर एकाचवेळी पाच UFO दिसले; रशियाने टिपले

IPL 2020 ला मोठा झटका; तगडा स्वदेशी स्पॉन्सर गमावला

CPL 2020 : मुन्रो, ब्राव्हो, पोलार्डनं धू धू धुतलं; शाहरुख खानच्या संघाची विजयाची हॅटट्रिक 

किम जोंग उन कोमात, बहीण उत्तर कोरियाची सत्ताधारी; माजी सहकाऱ्याचा गौप्यस्फोट

Gold Rates सोने खरेदी करायचेय? जाणून घ्या योग्य वेळ अन् साधा संधी

युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा

Web Title: Charge a scooter anywhere like a mobile; Okinawa launches, find out the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.