OLA EV ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Electric Scooter; केवळ ४९९ रूपयांत करता येणार बुक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 03:50 PM2021-11-21T15:50:37+5:302021-11-21T15:51:03+5:30

Bounce Electric २ डिसेंबर रोजी इलेक्ट्रीक स्कूटर Infinity लाँच करणार आहे.

bounce infinity electric scooter to launch in india on 2nd december in just 499 rs | OLA EV ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Electric Scooter; केवळ ४९९ रूपयांत करता येणार बुक

OLA EV ला टक्कर देण्यासाठी येतेय नवी Electric Scooter; केवळ ४९९ रूपयांत करता येणार बुक

Next

Bounce Electric लवकरच आपली इलेक्ट्रीक स्कूटर (Electric Scooter) इन्फिनिटी भारतात लाँच करणार आहे. २ डिसेंबर रोजी ही स्कूटर लाँच करण्यात येणार असल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आली. ज्या दिवशी ही स्कूटर लाँच केली जाईल त्याच दिवसापासून याचं बुकींगही सुरू करण्यात येणार आहे. लाँच नंतर कंपनी पुढील वर्षापासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू करेल. OLA प्रमाणेच बाऊन्स EV देखील स्कूटरचं बुकींग ४९९ रूपयांच्या टोकन रकमेवर सुरू करेल.  Bounce Infinity स्कूटरसोबत स्मार्ट आणि वेगळी होणारी लिथियम आयन बॅटरी देण्यात आली आहे. गरज भासल्यास ही बॅटरी स्कूटरपासून वेगळी केली जाऊ शकते. याशिवाय गरजेनुसार ही बॅटरी चार्जही करता येऊ शकेल.

या स्कूटरमध्ये अनोखं  ‘Battery As A Service’ हा पर्यायही देण्यात आला आहे. ही स्कूटर ग्राहकांना विना बॅटरीदेखील खरेदी करता येईल. यानंतर ग्राहक बोनसच्या बॅटरी स्वॅपिंग नेटवर्कच्या मदतीनं शुल्क देऊन डिस्चार्ज बॅटरीच्या जाही फुल बॅटरी चार्ज बॅटरी स्कूटरमध्ये लावू शकता. या पर्यायामुळे बॅटरी असलेल्या स्कूटरच्या तुलनेत ४० टक्के कमी किंमतीत विना बॅटरीची स्कूटर खरेदी केली जाऊ शकते.

अद्याप अधिकृत माहिती नाही
कंपनीनं नव्या इन्फिनिटी ईव्हीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. याच दरम्यान कंपनीनं २०२१ या वर्षात 22Motors चं १०० टक्के अधिग्रहण जवळपास ५२ कोटी रूपयांमध्ये केल्याची माहिती दिली. या डीलनुसार इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंरनीनं २२ मोटर्सच्या राजस्थान येथील भिवाडी प्रकल्प आणि तेथील संपत्तीचे मालकी हक्क मिळवले आहेत. या प्रकल्पात वर्षाला १ लाख ८० स्कूटर्सचं उत्पादन केलं जाऊ शकतं. याशिवाय कंपनीनं दक्षिण भारतातही नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या धोरणाची घोषणा केली आहे.

Web Title: bounce infinity electric scooter to launch in india on 2nd december in just 499 rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.