BMW ची भन्नाट Electric Bike सादर; सिंगल चार्जवर मिळणार ‘इतकी’ रेंज  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 02:58 PM2021-09-07T14:58:43+5:302021-09-07T14:59:47+5:30

BMW CE 02 Launch: BMW CE 02 एक कॉन्सेप्ट इलेक्ट्रिक बाईक आहे, जी ताशी 90 किलोमीटरचा टॉप स्पीड देऊ शकते.

Bmw motorrad unveils concept ce 02 electric mini bike  | BMW ची भन्नाट Electric Bike सादर; सिंगल चार्जवर मिळणार ‘इतकी’ रेंज  

BMW ची भन्नाट Electric Bike सादर; सिंगल चार्जवर मिळणार ‘इतकी’ रेंज  

Next

जगभरातील विविध क्षेत्रातील कंपन्या इलेक्ट्रिक व्हेईकल क्षेत्रात उडी घेत आहेत. भारतात ओलाने आपली इलेक्ट्रिक स्कुटर सादर केली आहे. तर चीनमध्ये स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रिक गॅजेट्स बनवणारी शाओमी देखील ईव्ही लाँच करण्यासाठी सज्ज होत आहे. असे असताना ऑटो क्षेत्रातील कंपन्या कशा मागे राहतील. आपल्या लग्जरी व्हेइकल्ससाठी प्रसिद्ध असलेल्या BMW ने एक नवीन इलेक्ट्रिक बाईक लाँच केली आहे. जिचे नाव कंपनीने BMW CE 02 असे ठेवले आहे. अनोख्या आणि आधुनिक डिजाईनसह सादर झालेली ही एक मिनी इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट बाईक आहे.  

BMW CE 02 

कॉन्सेप्ट बाईक सादर करण्याची जर्मन कंपनी BMW ची ही काही पहिली वेळ नाही. याआधी देखील कंपनीने CE 04 जगासमोर ठेवली आहे. आता समोर आलेल्या BMW CE 02 इलेक्ट्रिक बाईकमध्ये 11kW क्षमतेची मोटर देण्यात आली आहे. ही ई-बाईक ताशी 90 किलोमीटरचा टॉप स्पीड देऊ शकते. या बाईकवर मिळणारा छोटा डिस्प्ले ही सर्व माहिती सहज दाखवू शकतो.  

BMW CE 02 बाईक सिंगल चार्जमध्ये 90 किलोमीटर अंतर गाठू शकते. या बाईकचे वजन 120 किलोग्रॅम आहे. परंतु कंपनीने या बाईकमधील बॅटरीची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच या ई-बाईकच्या किंमतीची आणि इतर स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली नाही. या बाईकची निर्मिती कधी सुरु होईल हे देखील कंपनीने अजून सांगितले नाही. परंतु आशा आहे कि लवकरच ही इलेक्ट्रिक बाईक रस्त्यावर फिरताना दिसले.  

Web Title: Bmw motorrad unveils concept ce 02 electric mini bike 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app