कंपनीनं लॉन्चपूर्वीच जारी केलं Skoda Kushaq चं स्केच, Hyundai Cretaला देणार टक्कर; जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 03:46 PM2021-02-18T15:46:15+5:302021-02-18T15:47:11+5:30

स्कोडा कंपनीची ही कार भारतात 2.0 प्रोजेक्टअंतर्गत स्कोडा आणि फॉक्सवेगन ब्रँडच्या अभियानांतर्गत लॉन्च करण्यात येईल.

Auto Skoda kushaq sketch revealed ahead of launch rivals of kia seltos and hyundai creta   | कंपनीनं लॉन्चपूर्वीच जारी केलं Skoda Kushaq चं स्केच, Hyundai Cretaला देणार टक्कर; जाणून घ्या खासियत

कंपनीनं लॉन्चपूर्वीच जारी केलं Skoda Kushaq चं स्केच, Hyundai Cretaला देणार टक्कर; जाणून घ्या खासियत

googlenewsNext
ठळक मुद्देकारचे दोन डिझाईन स्केचदेखील जारी करण्यात आले आहेत.स्कोडा कंपनीची ही कार भारतात 2.0 प्रोजेक्टअंतर्गत स्कोडा आणि फॉक्सवेगन ब्रँडच्या अभियानांतर्गत लॉन्च करण्यात येईल.या कारला देण्यात आलेले नाव संस्कृत, या भारतीय भाषेतून घेण्यात आले आहे.

नवी दिल्ली - झेक प्रजासत्ताकमधील मुख्य वाहन निर्माता कंपनी स्कोडाने (Skoda) आपली मिड साईझ एसयूव्ही कुशाक(KUSHAQ) भारतात लॉन्च करण्यासाठी कंबर कसली आहे. आपण 18 मार्च ही कार अधिकृतपणे जगासमोर आणणार असल्याची घोषणाही कंपनीने केली आहे. यानंतर, आता या कारचे दोन डिझाईन स्केचदेखील जारी करण्यात आले आहेत. यातून कारच्या एक्सटिरिअर अथवा आकारासंदर्भात माहिती मिळायला मदत होते. (Skoda kushaq sketch revealed ahead of launch)

महत्वाचे म्हणजे, स्कोडा कंपनीची ही कार भारतात 2.0 प्रोजेक्टअंतर्गत स्कोडा आणि फॉक्सवेगन ब्रँडच्या अभियानांतर्गत लॉन्च करण्यात येईल. हे मॉडेल या दोन्ही कंपन्यांच्या प्रोजेक्टअंतर्गत लॉन्च होणाऱ्या चार मॉडेल्सपैकी एक आहे. याच्या डिझाइन स्केचमध्ये  प्रोडक्शन मॉडेलची झलकही पाहायला मिळते. या कारला देण्यात आलेले नाव संस्कृत, या भारतीय भाषेतून घेण्यात आले आहे. 'कुशाक' शब्दाचा अर्थ 'राजा' अथवा 'सम्राट' असा होतो. जी पूर्णपणे भारतात तयार करण्यात आली आहे. 

Kia K8 चा First Look आला समोर; सेडान सेगमेंटमध्ये वाढणार स्पर्धा, पाहा लाँचबद्दल कंपनी काय म्हणाली?

कंपनीने या मिड साइझ एसयूव्हीला तिच्या नावाला शोभेल, असा बोल्ड आणि अॅग्रेसिव्ह लूक दिला आहे. समोर आलेल्या फोटोंवरून अंदाज लावला जात आहे, की गाडीच्या समोरच्या बाजूला शॉर्प कट आणि दोन पार्टच्या हेडलाइट्ससह रुंद ग्रिल देण्यात आली आहे. तर दुसऱ्या स्केचमध्ये, यात रूफ स्पॉयलर, रियर डिफ्यूजर आणि बोल्ड बंपर दिसत आहे. मात्र कारच्या इंटिरियरसंदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही. 

या पाच-सीटर कारची डिलिव्हरी या वर्षी सुरू होईल. फिचर्सचा विचार करता, या कारमध्ये एक माठे टचस्क्रीन इंफोटेनमेन्ट सिस्टिम, एक ऑल-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, वायरलेस चार्जिंग, क्रूझ कंट्रोलचा प्रयोग करण्यात येणार आहे. याशिवाय यात, इन-कार कनेक्टिव्हिटी टेक, पूश-बटन स्टार्ट/स्टॉप, सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आदिंचाही समावेश असेल. तसेच इंजिनचा विचार करता यात, 1.0-लीटर तीन-सिलेंडर टर्बो पेट्रोल आणि 1.5-लीटर चार-सिलेंडर टर्बो पेट्रोलचा वापर करण्यात येईल. जे 6-स्पीड मॅनुअल अथवा एक एएमटी ट्रान्समिशनसह जोडले जाईल.

इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत 5 मोठे गैरसमज; जाणून घ्या MG Moters च्या ZS EV कडून...

Web Title: Auto Skoda kushaq sketch revealed ahead of launch rivals of kia seltos and hyundai creta  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.