२०० जणांची यादी आल्यास सोसायटीत लसीकरण कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:05 AM2021-06-25T04:05:55+5:302021-06-25T04:05:55+5:30

जम्बो लसीकरण मोहिमेसाठी ११५ वॉर्डांत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. आजवर ३ लाख ...

Vaccination camp in the society if there is a list of 200 people | २०० जणांची यादी आल्यास सोसायटीत लसीकरण कॅम्प

२०० जणांची यादी आल्यास सोसायटीत लसीकरण कॅम्प

googlenewsNext

जम्बो लसीकरण मोहिमेसाठी ११५ वॉर्डांत लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली आहेत. यात लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे. आजवर ३ लाख ७९ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. शहरातील १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण जलदगतीने करण्याच्या दृष्टीने महापालिकेकडून सोसायटीमध्येही लसीकरण करण्याची मोहीम राबविली जाणार आहे. स्वतंत्र हॉल किंवा बसण्यासाठी मोकळी जागा, लस देण्यासाठी स्वतंत्र रुम आणि वेटिंग रुम ही व्यवस्था करावी लागेल. मोबाईल टीम सोसायटीत येऊन लसीकरण केले जाईल, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले.

म्युकरमायकोसिसचे २३० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

औरंगाबाद : म्युकरमायकोसिसचे दोन दिवसात नवीन दहा रुग्ण दाखल झाले असून, २३० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. एकूण रुग्णसंख्या १,०५९ इतकी झाली आहे. त्यापैकी अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३० आहे. मृत्यूचा आकडा १२८ असून, आतापर्यंत उपचार घेऊन घरी परतणारे ७०१ इतके रुग्ण आहेत. बुधवारी नवीन ४ तर गुरुवारी ६ रुग्ण दाखल झाले. १२८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झालेले ७०१ रुग्ण आहेत. एमजीएम रुग्णालय ६८, घाटी रुग्णालय ५३, डॉ. हेडगेवार ३१, एमआयटी २६, युनायटेड सिग्मा १२, देशमुख इन्स्टिट्यूट ७, कमलनयन बजाज ६, ओरियन सिटीकेअर ४, अ‍ॅपेक्स ५, धूत ५, जीडीसीएच ५ येथे रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वटवृक्षारोपण

औरंगाबाद : जनसहयोग सेवाभावी बहुद्देशीय संस्थेने वटसावित्री पौर्णिमानिमित्त गुरुवारी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते वटवृक्षांचे रोपण करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र पडेगाव येथील परिसरात २२१ वटवृक्ष रोपांची लागवड केली. यावेळी संस्थेचे प्रशांत गिरी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Vaccination camp in the society if there is a list of 200 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.