Unfortunate incident; On the eve of Rakshabandhan, a young man drowned in Hersul Lake | दुर्दैवी घटना; रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तरुणाचा हर्सूल तलावात बुडून मृत्यू

दुर्दैवी घटना; रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला तरुणाचा हर्सूल तलावात बुडून मृत्यू

ठळक मुद्देरविवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान झाली घटना

औरंगाबाद: हर्सूल तलावात पडल्याने पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री ८ वाजता घडली. याविषयी हर्सूल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रद्युम ईश्वर वरकड (वय १८, रा.सारावैभव सोसायटी, जटवाडा रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की, मृत प्रद्युम हा २ ऑगस्ट रोजी सायंकाळी हर्सूल तलाव परिसरात फिरायला गेला होता. रात्री ८ वाजेच्या सुमारास तो तलावात पडला. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी पोलीस आणि अग्निशामन दलाला कळविण्यात आली. अग्निशमन अधिकारी  आर. के. सुरे, हरिभाऊ घुगे, शिवसभा कल्याणकर, संजय शिंदे यांनी दोन तास शोध मोहीम राबवून प्रद्युमला बेशुद्धावस्थेत तलावाबाहेर काढले. 

यानंतर त्याला सुदाम दाभाडे यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागाच्या डॉक्टरांनी त्याला तपासून तो मरण पावल्याचे सांगितले. या विषयी  हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक  नितीन कामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भादवे तपास करीत आहेत.

Web Title: Unfortunate incident; On the eve of Rakshabandhan, a young man drowned in Hersul Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.