पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पत्रकाराला मारहाण करून लुटले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:27 PM2021-01-20T16:27:51+5:302021-01-20T16:29:47+5:30

crime news : महावीर चौक परिसरात घडली घटना

Under the pretext of asking for an address, the journalist was beaten and robbed | पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पत्रकाराला मारहाण करून लुटले 

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पत्रकाराला मारहाण करून लुटले 

googlenewsNext
ठळक मुद्देपैसे नसल्याचे सांगताच त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेऊन ते पसार झाले.

औरंगाबाद : काम आटोपून रात्री २ वाजेच्या सुमारास घरी निघालेल्या एका दैनिकाच्या पत्रकाराला मारहाण करून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी हिसकावून नेणाऱ्या चोरट्याला क्रांती चौक पोलिसांनी अटक केली. ही घटना महावीर चौक परिसरातील हॉटेल रविराजसमोर सोमवारी (दि. १८) रात्री २ वाजेच्या सुमारास घडली.

शेख चांद पाशा नईम शेख असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार कृष्णकांत भगवंत प्रसाद तिवारी हे एका दैनिकात काम करतात. १८ जानेवारी रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास ते काम आटोपल्यानंतर म्हाडा कॉलनी येथील घरी जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले. हॉटेल रविराजसमोर दोन अनोळखी तरुणांनी त्यांना क्रांती चौक पोलीस ठाण्याकडे हाच रस्ता जातो का, असे विचारणा केली आणि रोखले. त्यांच्याकडे २०० रुपयांची मागणी केली. तिवारी यांनी पैसे नसल्याचे सांगताच त्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या बोटातील १५ हजारांची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेऊन ते पसार झाले. याविषयी त्यांनी क्रांती चौक ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे, उपनिरीक्षक संतोष राऊत, कर्मचारी नस्सीम पठाण, मनोज चव्हाण, अजीज खान आणि अमोल मनोरे यांनी तपास करून आरोपी चांद पाशा याला सिडको बसस्थानक येथे पकडले.
 

Web Title: Under the pretext of asking for an address, the journalist was beaten and robbed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.