Two-wheeler injured in truck crash | ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

वाळूज महानगर : ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार त्र्यंबक जगन्नाथ शिंदे(४० रा.नांदेडा) हा गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास खोजेवाडी फाट्यावर घडली. जखमी दुचाकीस्वारास ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.


त्र्यंबक शिंदे हा दुचाकीने (एम.एच.२०, ए.ई.६९७७) गुरुवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास मुंबई- नागपूर महामार्गावरुन जात असताना त्याला ट्रकने जोराची धडक दिली. यात त्र्यंबक शिंदे हा गंभीर जखमी झाला. या अपघाताची एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.


Web Title: Two-wheeler injured in truck crash
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.