Two of them seriously injured in the jeep | जीपच्या धडकेने दोनजण गंभीर जखमी
जीपच्या धडकेने दोनजण गंभीर जखमी

करमाड : जालन्याहून औरंगाबादकडे जाणाऱ्या भरधाव जीपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना औरंगाबाद-जालना मार्गावर गोलटगाव फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजता घडली. जखमींमध्ये भानुदास रावसाहेब काळे, गणेश किसन काळे यांचा समावेश आहे.


जालन्याहून जीप (एम. एच.२३ -ए झेड ०७०७) औरंगाबादकडे जात होती. गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास गोलटगाव फाट्याजवळ या भरधाव जीपने करमाडहून गोलटगाव फाट्याकडे जाणाºया दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील भानुदास रावसाहेब काळे, गणेश किसन काळे (रा. बाजार वाहेगाव ता. बदनापूर जि. जालना) हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जीपचालकाने दोन्ही जखमींना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. रात्री उशिरापर्यंत अपघाताची पोलीस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

 


Web Title: Two of them seriously injured in the jeep
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.