Two substances disappeared from the patient's stomach | रुग्णांच्या ताटातून दोन पदार्थ गायब
रुग्णांच्या ताटातून दोन पदार्थ गायब

ठळक मुद्देघाटी : नाश्त्याला दोन महिन्यांपासून फक्त पोहे

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या आहारातून दोन पदार्थ गायब झाले आहेत. पैसे थकल्याने कंत्राटदाराने या पदार्थांचा पुरवठा बंद केला आहे. परिणामी तब्बल दोन महिन्यांपासून नाश्त्यात फक्त पोहे आणि गूळ शेंगदाण्याचे लाडू दिले जात आहेत.
घाटीत मराठवाड्यासह लगतच्या भागातून दररोज मोठ्या संख्येने रुण उपचारासाठी दाखल होतात. याठिकाणी आल्यानंतर किमान दोन अथवा त्यापेक्षा अधिक दिवस रुग्ण, नातेवाईकांना थांबावे लागते. घाटी प्रशासनाकडून वॉर्डांमध्ये दाखल होणाºया रुग्णांना नाश्ता आणि जेवण दिले जाते. घाटीत स्वयंपाकगृहाद्वारे दररोज ५०० रुग्णांची जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था केली जाते. रुग्णांना चांगल्या दर्जाच्या औषधोपचारासह सकस आहारदेखील मिळणे गरजेचे असते.
रुग्णांना जेवणाबरोबर पोहे, उच्च प्रथिनांची गरज असलेल्यार रुग्णांना अंडी, गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू तसेच दूध, ब्रेड दिले जाते. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून अंडी, ब्रेड देणे बंद झाले आहे. आजारातून लवकर बाहेर पडण्यासाठी उच्च प्रथिने महत्त्वाची ठरतात. डॉक्टरांकडून तसा आहार सांगितला जातो. परंतु सध्या उच्च प्रथिनांची गरज असलेल्या रुग्णांना फक्त गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू दिली जातात. नाश्त्यामध्ये फक्त पोहेच दिले जात आहेत. यापूर्वी रुग्णांना मोसबी देण्यात येत असे. तीदेखील देणे बंद झाले आहे.
नातेवाईकांना फटका
रुग्णालयातून मिळणारा आहार बंद झाल्याने गोरगरीब रुग्णांच्या नातेवाईकांना तो बाहेरून विकत आणावा लागतो. त्यासाठी आर्थिक फटका सहन करण्याची वेळ येत आहे. थकीत बिलासाठी कंत्राटदाराने या पदार्थांचा पुरवठा बंद केल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली.
-----------


Web Title: Two substances disappeared from the patient's stomach
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.