दोन सिंगल बातम्या निंभोरा व पळशी ब्रु गावाच्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:07 AM2021-01-19T04:07:24+5:302021-01-19T04:07:24+5:30

वासडी : निंभोरा (ता. कन्नड) ग्रामपंचायतीवर ओम शिवशक्ती बजरंगबली युतीच्या ग्रामविकास पॅनेलने अकरापैकी दहा जागांवर विजय मिळविला, तर ग्रामविकास ...

Two single news Nimbhora and Palashi Brew village news | दोन सिंगल बातम्या निंभोरा व पळशी ब्रु गावाच्या बातम्या

दोन सिंगल बातम्या निंभोरा व पळशी ब्रु गावाच्या बातम्या

googlenewsNext

वासडी : निंभोरा (ता. कन्नड) ग्रामपंचायतीवर ओम शिवशक्ती बजरंगबली युतीच्या ग्रामविकास पॅनेलने अकरापैकी दहा जागांवर विजय मिळविला, तर ग्रामविकास पॅनेलने केवळ एक जागा जिंकली.

दोन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्याने नऊ जागांसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भगवान गीते यांच्या नेतृत्वाखालील ओम शिवशक्ती बजरंगबली युतीच्या ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली.

भगवान गीते, वामन सोनवणे, शिवनंदा नागरे, रशिदाबी शहा, कारभारी सोनवणे, मीराबाई डिघोळे, हिराबाई घुगे, अनुसया घुले, विश्वास गायकवाड (बिनविरोध), हिराबाई कंचार (बिनविरोध) यांचा निवडणुकीत विजय झाला.

----------------------

पळशी (बु.) वर महर्षी पॅनेलचा विजय

वासडी : कन्नड तालुक्यातील पळशी (बु.) ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार हर्षवर्धन जाधव समर्थक मुबिन पटेल यांच्या विकास महर्षी पॅनेलला नऊपैकी सात जागा मिळाल्या. मुबिन पटेल आणि संदीप जाधव यांचे केदारनाथ ग्रामविकास पॅनेल यांच्यात नऊ जागांसाठी अटीतटीची लढत झाली. यात विकास महर्षीने विजय मिळविला.

Web Title: Two single news Nimbhora and Palashi Brew village news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.