Two laborers die after drowning in a lake in Khulatabad | खुलताबादच्या तलावात बुडून दोन मजूर युवकाचा मृत्यू 
खुलताबादच्या तलावात बुडून दोन मजूर युवकाचा मृत्यू 

खुलताबाद (औरंगाबाद ) : खुलताबाद येथील धर्मा तलावात कसाबखेडा येथील दोन युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली. विकास भगवान किर्तीकर (22) व अजिम शेख अहेमद (34) अशी मृतांची नावे आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कसाबखेडा येथील विकास भगवान किर्तीकर (22) व अजिम शेख अहेमद (34) हे दोन मजुरी करणारे युवक मजुरीच्या कामाचे पैसे घेण्यासाठी आज दुपारी एक वाजेच्या सुमारास खुलताबाद येथे आले. पैसे घेऊन परत जात असतांना खुलताबाद येथील एस.टी. बसस्थानकामागील धर्मा तलावात पोहण्यासाठी उतरले. मात्र,  तलावातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. 

काही नागरिकांच्या हे लक्षात आले असता त्यांनी बचावासाठी धाव घेतली मात्र तोपर्यंत दोघेही बुडाली. यानंतर काही युवकांनी एक तास शोध घेऊन युवकांची मृतदेह पाण्याबाहेर काढली. घटनास्थळी कसाबखेडा येथील सरपंच नईम पटेल, तंटामुक्त गावसमितीचे अध्यक्ष तनवीर पटेल, ग्रा.पं.सदस्य सुनील औटे पाटील, पोलीस पाटील संतोष सातदिवे , यांनी शोधकार्यात मदत केली. पोहेकॉ संजय जगताप, पोकॉ गणेश लिपने यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह खुलताबाद ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. 


Web Title: Two laborers die after drowning in a lake in Khulatabad
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.