बिबट्याच्या हल्याने औरंगाबाद जिल्ह्यात दोन ठारच्या घटना

By | Published: December 2, 2020 04:00 AM2020-12-02T04:00:01+5:302020-12-02T04:00:01+5:30

जिल्ह्यातील ग्रामिण भागात गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात दि. २३ नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील आपेगावात बिबट्याने ...

Two killed in leopard attack in Aurangabad district | बिबट्याच्या हल्याने औरंगाबाद जिल्ह्यात दोन ठारच्या घटना

बिबट्याच्या हल्याने औरंगाबाद जिल्ह्यात दोन ठारच्या घटना

googlenewsNext

जिल्ह्यातील ग्रामिण भागात गेल्या काही दिवसात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात दि. २३ नोव्हेंबर रोजी पैठण तालुक्यातील आपेगावात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पिता-पुत्राचा मृत्यू झाला.

दुसऱ्या घटनेत पैठण तालुक्यातीलच करजगाव येथे चार शेळ्यांवर वन्य प्राण्याने हल्ला करुन ठार मारल्याची घटना दि. २९ नोव्हेंबर रोजी घडली. प्रत्यक्षदर्शी हा हल्ला बिबट्याने केल्याचे सांगत आहेत. मात्र वन विभागाने त्याला दुजोरा दिलेला नाही. हा हल्ला लांडगा किंवा तरस या प्राण्याने केला असावा, असे वन खात्याचे मत आहे.

गोदावरीचा काठ हा बिबट्याचा कॅरिडाॅर आहे. हा कॅरिडॉर सुरू होतो, तो वैजापुरपासून गंगापुर, कायगाव टोकामार्गे पैठण, आपेगावमार्गे पाचोडपर्यंत. या परीसरात मोठ्याप्रमाणावर उसाची शेती आहे. ही शेतीच बिबट्याच्या अधिवासासाठी उपयुक्त आहे.

वन खात्याने जुन्नरला ज्या पद्धतीने जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी) स्थापन केली आहे. त्याच धरतीवर वैजापुर, गंगापुर आणि पैठणमध्ये क्युआरटी आणि जनजागृती करण्याचे प्रयोग केले पाहीजेत.

जनावराच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना १५ लाखाची आर्थिक मदत राज्य शासनाकडून मिळते.

कोट...

माणुस हा त्याचे खाद्य नाही..

बिबट्याचे माणुस हे खाद्य नाही, त्यामुळे तो जेव्हाही हल्ला करतो. तेव्हा तो स्वत:ला असुरक्षित समजतो किंवा त्याला माणुस हा शिकार वाटतो, त्यामुळेच तो हल्ला करतो. मुळात बिबट्याच नाही, तर सगळे वन्य प्राणी हे लाजाळू असतात. ते स्वत:हून माणसावर हल्ला करीत नाहीत. त्यांना असुरक्षित वाटल्याशिवाय ते माणसावर हल्ला करीत नाहीत.शेवटचा पर्याय म्हणून ते माणसावर हल्ला करतात. त्यामुळे एखाद्या घटनेने लोकांनीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबेनी केले.

----

मृत्यू पावलेल्यांना अशी मिळते मदत?

---

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांना १५ लाखाची आर्थिक मदत राज्य शासनाकडून मिळते. ही मदतीपुर्वी तातडीचे मदत म्हणून १ लाख रूपये देण्याची तरतुद आहे. यामध्ये बिबट्या, वाघ, अस्वल, रान गवा, हत्ती, लांडगा, रान डुक्कर यांच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाला, तर ही मदत मिळते. त्यासाठी वारसा प्रमाणपत्र सादर करावे लागते. तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याच्या प्रमाणपत्राशिवाय ही मदत मिळत नाही. त्यासाठी शवविच्छेदन अहवालात त्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेेले असावे. त्याशिवाय ही मदत दिली जात नाही. वारसही निश्चित झालेला असला पाहीजे. त्याशिवाय ही मदत मिळत नाही, असेही मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी सांगितले.

---

काय करावे

---

० बिबट्याचा वावर असणाऱ्या परिसरात जातांना आवाज करीत जा.

० मोठ्या आवाजात गाणी लावा किंवा मोठ्या आवाजात बोला.

० थाळ्या वाजवा किंवा सातत्याने आवाज होईल, असे उपकरण सोबत ठेवा.

० संध्याकाळी दिवे, बॅटऱ्या किंवा प्रकाश राहील असा टेंभा ठेवा.

० शेतात खाली बसून काम करू नका.

० एकावेळी एकाने शेतात जाण्याच्याऐवजी तीन ते चार जण जा.

० एक जण बसून काम करीत असेल तर दूसऱ्याने उभ्याने त्याच्याशी बोला.

० बिबट्या दिसल्यावर पळू नका. कारण तो पाठलाग करतो.

० दिसल्यावर दूर जाण्याचा प्रयत्न करा.

० जागे वरून हलू नका, एकाच जागी थांबा.

० जनावरांच्या गोठ्यात किंवा बांधण्याच्या ठिकाणी मोठे लाईट लावा.

----

हे करू नका

० बिबट्याला पाहील्यावर पळू नका.

० त्याला हुस्कवण्याचा प्रयत्न करू नका.

० त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका.

० एकट्याने शेतात जाऊ नका.

- अरूण पाटील, उपवन संरक्षक, औरंगाबाद.

Web Title: Two killed in leopard attack in Aurangabad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.