True jet plane suddenly canceled | ट्रू जेटचे विमान अचानक रद्द
ट्रू जेटचे विमान अचानक रद्द

ठळक मुद्देमहिनाभरात दुसऱ्यांदा रद्द : हैदराबादला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारे ट्रू जेट कंपनीचे हैदराबाद-औरंगाबाद विमान अचानक रद्द होण्याचा प्रकार सुरूच आहे. ऐन उड्डाणाच्या काही तास आधी बुधवारी हे विमान रद्द झाले. त्यामुळे औरंगाबादहून हैदराबादला जाणाºया प्रवाशांचे नियोजन विस्कळीत झाले. महिनाभरात दुसऱ्यांदा हैदराबादला जाणारे विमान रद्द झाले.
ट्रू जेटचे विमान सायंकाळी ६ वाजता हैदराबादहून औरंगाबादला येते आणि सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास पुन्हा हैदराबादसाठी उड्डाण घेते. जवळपास ५० प्रवाशांनी नियोजन करून विमानाचे तिकीट बुक केले होते; परंतु अचानक विमान रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली. त्यामुळे अनेक प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करून प्रवास करावा लागला, तर अनेकांनी पुढील दिवसांत प्रवासाचे नियोजन करण्यावर भर दिला.
ऐन उड्डाणाच्या चार तास आधी २२ जून रोजीदेखील हे विमान रद्द झाले होते. त्याशिवाय ३० एप्रिल रोजीही विमान रद्द झाले होते. अचानक विमान रद्द होत असल्याने प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. प्रत्येक वेळी त्यासाठी आॅपरेशनल कारण कंपनीकडून सांगितले जात आहे. मात्र, विमान रद्द होण्याच्या प्रकाराविषयी प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
आॅपरेशनल कारण
आॅपरेशनल कारणामुळे विमानाचे उड्डाण रद्द झाले. यासंदर्भात प्रवाशांना सकाळी दहा वाजताच माहिती देण्यात आली होती, असे ट्रू जेट कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले.


Web Title: True jet plane suddenly canceled
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.