कोरोना काळात घरी उपचार घेणाऱ्यांमध्ये तीनपट वाढ; शंभरावर रुग्ण घरीच ‘ऑक्सिजन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 06:29 PM2020-09-18T18:29:52+5:302020-09-18T18:34:36+5:30

दमा असलेल्या रुग्णांसाठी खबरदारी म्हणून छोटे सिलिंडर घरी ठेवण्यावर अनेकांकडून भर दिला जातो

Triple increase in home treatment in Aurangabad during Corona period; Hundreds of patients at home on oxygen | कोरोना काळात घरी उपचार घेणाऱ्यांमध्ये तीनपट वाढ; शंभरावर रुग्ण घरीच ‘ऑक्सिजन’वर

कोरोना काळात घरी उपचार घेणाऱ्यांमध्ये तीनपट वाढ; शंभरावर रुग्ण घरीच ‘ऑक्सिजन’वर

googlenewsNext
ठळक मुद्देहिमोग्लोबिनचे प्रमाण अधिक कमी झाल्यास रुग्णास कृत्रिम ऑक्सिजनची गरज उपचार घेतल्यानंतरही अनेकांना घरीही ऑक्सिजन सिलिंडर लावावा लागत आहे.

औरंगाबाद : औरंगाबादेत शंभरावर रुग्ण सध्या घरातच ऑक्सिजन सिलिंडरवर आहेत. कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना निगेटिव्हसह श्वसनाशी निगडित रुग्णांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वीच्या तुलनेत सध्या घरी ऑक्सिजन सिलिंडर वापरण्याच्या प्रमाणात तीनपट वाढ झाली आहे.

विविध आजारांमध्ये रुग्णांना ऑक्सिजनची गरज असते. रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झालेले, न्यूमोनिया, दमा, दीर्घकालीन श्वसनाचे आजार, फुफ्फुसात पाणी झाल्यास रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अधिक कमी झाल्यास रुग्णास कृत्रिम ऑक्सिजनची गरज असते. अशा अवस्थेत रुग्ण रुग्णालयात दाखल होतात; परंतु रुग्णालयात उपचार घेतल्यानंतरही अनेकांना घरीही ऑक्सिजन सिलिंडर लावावा लागत आहे. अनेक कोरोना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह रुग्णांनाही ऑक्सिजनची गरज असते.  उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांना घरी ऑक्सिजन थेरपी सांगितली जाते. त्यामुळे घरी ऑक्सिजन सिलिंडर वापरणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. रुग्णालयांना आणि घरी ऑक्सिजन सिलिंडर देणाऱ्या एजन्सीधारकांकडून प्राप्त माहितीनुसार दररोज ५ ते ७ जणांना घरी ऑक्सिजन सिलिंडर दिले जात आहे. त्यासाठी डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक असते. डिपॉझिट घेऊन हे सिलिंडर दिले जाते, तर छोटे सिलिंडर थेट विक्री केली जातात; परंतु छोटे सिलिंडर वापरण्याचे प्रमाण कमी आहे. अनेक जण डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय ऑक्सिजन सिलिंडरची मागणी करतात; परंतु त्यास नकार दिला जात असल्याचे सांगण्यात आले.

ऑक्सिजन सिलिंडर एजन्सीचे सुजित जैन म्हणाले, कोरोना प्रादुर्भावापूर्वी घरी रोज २ ते ३ सिलिंडर दिले जात होते. आता हे प्रमाण रोजचे ७ ते ८ झाले आहे. डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कोणालाही सिलिंडर दिले जात नाही. ओळखपत्र म्हणून आधार कार्डची छायांकित प्रतही घेतली जाते. सध्या जवळपास १०० रुग्णांसाठी जम्बो सिलिंडर दिलेले आहेत. एक सिलिंडर साधारण चार ते पाच दिवस जातो. दमा असलेल्या रुग्णांसाठी खबरदारी म्हणून छोटे सिलिंडर घरी ठेवण्यावर अनेकांकडून भर दिला जातो, असे ते म्हणाले. रुग्णालयांकडून मागणी वाढत असल्याने आता आम्ही घरी आॅक्सिजन सिलिंडर देणे थांबविल्याचे एका एजन्सीधारकाने सांगितले.

होम आयसोलेशमध्ये २२३ रुग्ण
औरंगाबादेत बुधवारी सायंकाळपर्यंत कोरोनाचे २२३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये होते. घरात स्वंतत्र रूम, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि घरी दिवसरात्र काळजी घेणारी व्यक्ती असलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनसाठी परवानगी दिली जाते. या रुग्णांवर डॉक्टरांकडून लक्ष ठेवले जाते. यातील अनेक रुग्णही घरी आॅक्सिजनवर आहेत.

सिलिंडरसाठी दौलताबादहून नागरिक शहरात
दौलताबाद येथील रिक्षाचालक गुरुवारी मोंढ्यातील एजन्सीला ऑक्सिजन सिलिंडर परत देण्यासाठी आला होता. नातेवाईकासाठी जम्बो सिलिंडर नेला होता. पाच दिवसांनंतर तो संपल्याने परत करण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले.

Web Title: Triple increase in home treatment in Aurangabad during Corona period; Hundreds of patients at home on oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.