उंडणगावात उभ्या कांद्यांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:07 AM2021-03-04T04:07:45+5:302021-03-04T04:07:45+5:30

उंडणगाव : येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या कांदा पिकाची कापणी करून चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Theft of vertical onions in Undangaon | उंडणगावात उभ्या कांद्यांची चोरी

उंडणगावात उभ्या कांद्यांची चोरी

googlenewsNext

उंडणगाव : येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभ्या असलेल्या कांदा पिकाची कापणी करून चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशा विचित्र चोरीच्या प्रकारामुळे उंडणगाव शिवारातील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

उंडणगाव शिवारातील काटोन भागात विठ्ठल तोताराम पंडित यांची गट नंबर १४ मध्ये जमीन आहे. त्यांनी आपल्या एका एकरात कांदा पिकांची लागवड केलेली आहे. त्या लागवड केलेल्या कांद्याची ते लवकरच काढणी करणार होते. मात्र, अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री शेतात जाऊन लागवड केलेला कांद्याचे पीक उपटून घेतले आणि कांदा कापणी करून चोरी करून घेऊन गेले. शेतकरी विठ्ठल पंडित हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले. त्यांनी हा प्रकार पाहताच त्यांना धक्काच बसला. मोठ्या कष्टाने हातातोंडाशी आलेला घास गेल्याने त्यांच्या डो‌ळ्यात आता पाणीच उरले आहे. अशा विचित्र चोरीच्या प्रकारामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंडित यांचा सुमारे पाच क्विंटल कांदा चोरी गेल्याने वीस हजारांचे नुकसान झाले आहे.

गेल्यावर्षीही घडला होता असाच प्रकार

उंडणगाव शिवारातील काटोन भागात मागील वर्षीही अज्ञात चोरट्यांनी उभ्या बाजरीच्या कणसांची चोरी केली होती. तर यंदा गावातील शेतकरी शिवाजी उखर्डे यांनी पेरलेल्या हरभरा पिकांची सोंगणी करून सुडी घातलेली होती. ती हरभऱ्याची सुडीच चोरी गेली आहे. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी उभ्या असलेल्या कांदा पिकांची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी या भागातील शेतकरी विठ्ठल पंडित, नारायण भागवत, पप्पूशेठ दुसाद, भगवान धनवई, विष्णू पंडित, विनोद पंडित, प्रदीप व्यवहारे, शिवाजी उखर्डे, शंकर भागवत यांच्याकडून केली आहे.

---------

फोटो कॅप्शन : उंडणगाव शिवारातील काटोन भागातील शेतात उभे असलेले कांदा पीक उपटून कांदा चोरी करण्यात आला. तर त्या कांद्याची पात जागेवर टाकून चोरट्यांनी पोबारा केला.

Web Title: Theft of vertical onions in Undangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.