मराठवाड्यातील ४६ नगर परिषदा, ८ जिप, ३ मनपांची मुदत संपली; सर्व ठिकाणी प्रशासकराज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 12:47 PM2022-05-07T12:47:11+5:302022-05-07T12:47:38+5:30

विभागातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक काम पाहत आहेत

The term of 46 Municipal Councils, 8 Zilla Parishads and 3 Municipal Corporations in Marathwada has expired; Simultaneous elections is impossible | मराठवाड्यातील ४६ नगर परिषदा, ८ जिप, ३ मनपांची मुदत संपली; सर्व ठिकाणी प्रशासकराज

मराठवाड्यातील ४६ नगर परिषदा, ८ जिप, ३ मनपांची मुदत संपली; सर्व ठिकाणी प्रशासकराज

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील ३ महापालिका, ८ जिल्हा परिषद आणि ४६ नगर परिषदांसह २ नगरपंचायतींची मुदत संपली आहे. या सर्व ठिकाणी एकाच वेळी निवडणुका घेणे अशक्य असल्याची चर्चा प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी निवडणुका घेण्याबाबत निकाल दिल्यानंतर विभागातील मनपा, जि.प., न.प. निवडणुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होण्याबाबत अद्याप काहीही स्पष्टता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

औरंगाबाद महापालिकेची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. लातूर, परभणी मनपाची मुदत मे २०२० मध्ये तर नांदेड-वाघाळा मनपाची मुदत ऑक्टोबर २०२२ पर्यंत आहे. तर औरंगाबाद, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदांवर प्रशासक काम पाहत आहेत. हिमायतनगरची मुदत जानेवारी २०२१ मध्ये संपली आहे. रेणापूर नगरपंचायतीची जून २०२२ तर संपणार आहे. फुलंब्री नगरपंचायतीची मुदत जानेवारी २०२३ मध्ये संपेल.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद, कन्नड, गंगापूर, पैठण, बीड जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, गेवराई, परळी, हिंगोलीतील कळमनुरी, हिंगोली, वसमतनगर, जालना जिल्ह्यातील भोकरदन, अंबड, परतूर, जालना, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, उद्गीर, निलंगा, औसा, नांदेड जिल्ह्यातील कुंडलवाडी, मुखेड, कंधार, बिलोली, देगलूर, मुदखेड, धर्माबाद, उमरी, हदगाव, भोकर तर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग, भूम, परंडा, मुरूम, उस्मानाबाद, कळंब, उमरगा या नगर परिषदांची मुदत संपली आहे. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ, पूर्णा, पाथरी, मानवत, जिंतूर, सेलू, गंगाखेड नगर परिषदांमध्ये निवडणूक घ्यावी लागणार आहे.

फक्त चार न.प.मध्ये निवडणुका नाहीत 
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड नगर परिषदेची मुदत एप्रिल २०२४, वैजापूर न.प. मे २०२३, नांदेड जिल्ह्यातील लोहा न.प.जानेवारी २०२४ तर किनवट न.प.ची मुदत जानेवारी २०२३ मध्ये संपणार आहे. बाकी उर्वरित ठिकाणी निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

सगळीकडे प्रशासकराज
सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाची पूर्ण प्रत अद्याप प्रशासनाला मिळालेली नाही. याबाबत निवडणूक आयोगाकडूनच पूर्ण मार्गदर्शन येईल, तेव्हा माहिती मिळू शकेल. सध्या तरी विभागातील मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक काम पाहत असल्याचे नगरपालिका प्रशासन सूत्रांनी सांगितले.

Web Title: The term of 46 Municipal Councils, 8 Zilla Parishads and 3 Municipal Corporations in Marathwada has expired; Simultaneous elections is impossible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.