गुूुढीपाडव्याच्या अगोदर पगार न झाल्याने शिक्षक नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:05 AM2021-04-13T04:05:46+5:302021-04-13T04:05:46+5:30

पैठण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बाराशे शिक्षकांच्या फेब्रुवारी महिन्याच्या पगाराचे बजेट दीड महिना उशिराने सोमवारी गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर प्राप्त ...

Teacher upset over non-payment of salary before Gudipadva | गुूुढीपाडव्याच्या अगोदर पगार न झाल्याने शिक्षक नाराज

गुूुढीपाडव्याच्या अगोदर पगार न झाल्याने शिक्षक नाराज

googlenewsNext

पैठण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या बाराशे शिक्षकांच्या फेब्रुवारी महिन्याच्या पगाराचे बजेट दीड महिना उशिराने सोमवारी गटविकास अधिकारी यांच्या खात्यावर प्राप्त झाले होते. पंचायत समिती शिक्षण विभागातून पगाराची देयकेसुद्धा चार दिवस अगोदरच लेखा विभागात सादर केलेली होती. गटविकास अधिकारी हे सुद्धा सोमवारी कार्यालयात उपस्थित होते. मात्र, लेखा विभागाचे लेखाधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने बाराशे शिक्षकांचे पगार सोमवारी होऊ शकले नाहीत.

गुढीपाडवा व भीमजयंती या सणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे पगार वेळेवर करा, असे शासननिर्देश असतानाही लेखाधिकाऱ्यांनी आदेशाला केराची टोपली दाखवल्याने शिक्षकांवर हे सण पगाराविनाच साजरे करण्याची वेळ आली आहे. याबाबत लेखाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षक सेनेचे तालुकाध्यक्ष अमोल एरंडे व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Teacher upset over non-payment of salary before Gudipadva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.