विद्यार्थी हितासाठी धडपडणारे डॉ. उल्हास उढाण यांचे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 02:15 PM2021-12-06T14:15:50+5:302021-12-06T14:16:31+5:30

Dr. Ulhas Udhan passes away : सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अध्यक्ष म्हणून कार्य पाहिले.

Struggling for the benefit of students, Dr. Ulhas Udhan passes away | विद्यार्थी हितासाठी धडपडणारे डॉ. उल्हास उढाण यांचे निधन 

विद्यार्थी हितासाठी धडपडणारे डॉ. उल्हास उढाण यांचे निधन 

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरा मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन सदस्य, विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. उल्हास उढाण यांचे मध्यरात्री २.३० वाजेदरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह, विद्यार्थ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, डॉ. उधाण काल मित्रांच्या भेटीसाठी मालेगावला गेले होते. रात्री ११ वाजेदरम्यान घरी पोहचले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटले आणि हृदयविकाराचा झटका आला. यातच मध्यरात्रीनंतर त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी २. ४५ मिनिटांनी सेंट्रल नाका स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून डॉ. उल्हास उढाण हे पक्षात सक्रीय होते. सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मराठवाडा अध्यक्ष अध्यक्ष म्हणून कार्य पाहिले. तसेच ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परीषदेवर राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परीषद सदस्य देखील राहिले. विद्यार्थी हितासाठी ते कायम आग्रही होते.

Web Title: Struggling for the benefit of students, Dr. Ulhas Udhan passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.