Strike the neighbor from garbage | कचरा टाकण्यावरून शेजाऱ्याला मारहाण 
कचरा टाकण्यावरून शेजाऱ्याला मारहाण 

औरंगाबाद : घरासमोर आणि नालीत कचरा टाकण्यावरून सिडकोत राहणाºया दोन शेजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना १७ जुलै रोजी घडली. याविषयी सिडको ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.


महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार कचरा टाकण्यावरून झालेल्या वादानंतर शंकर जाधव आणि त्यांचा मुलगा राहुल यांनी त्यांना शिव्या देत मारहाण करून छेड काढली. या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी शंकर जाधव (६६) आणि राहुल जाधवविरोधात गुन्हा नोंदविला, तर शंकर रखमाजी जाधव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राजू रणयेवले, शुभम रनयेवले आणि एका महिलेने घरासमोरील बदामाच्या झाडाचे पान नालीत फेकले, यावरून वाद निर्माण करून त्यांनी शिवीगाळ करून त्यांना आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली.


Web Title:  Strike the neighbor from garbage
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.