Stone laid in the head of the elderly father for the distribution of the house property | घराच्या वाटणीसाठी वृद्ध बापाच्या डोक्यात घातला दगड
घराच्या वाटणीसाठी वृद्ध बापाच्या डोक्यात घातला दगड

औरंगाबाद : घर विकून मला हिस्सा द्या, असे म्हणत मुलानेच ७२ वर्षीय जन्मदात्याच्या डोक्यात दगड टाकून मारहाण केल्याची घटना २५ जून रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात मुलाविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

सचिन बन्सीलाल बनकर असे आरोपी मुलाचे नाव आहे. याविषयी पोलिसांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील गुरूदत्तनगर येथील बन्सीलाल चंद्रभान बनकर हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. गुरूदत्तनगर येथे त्यांचे घर आहे. हे घर विकून आपल्याला पैसे द्यावे, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा मुलगा सचिन करीत आहे. २५ जून रोजी रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास सचिन हा वडिलांच्या घरी गेला. तेथे त्याने पुन्हा घराच्या वाटणीचा वाद उकरून काढत भांडण सुरू केले. यावेळी त्याने तेथील दगड उचलून वृद्ध बन्सीलाल यांच्या डोक्यात मारला. यामुळे बन्सीलाल यांच्या डोक्यातून रक्त निघू लागले. यानंतर त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन तो तेथून निघून गेला. या घटनेनंतर बन्सीलाल यांनी पुंडलिकनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस हेडकॉन्स्टेबल सुखदेव कावरे पाटील हे तपास करीत आहेत.


Web Title: Stone laid in the head of the elderly father for the distribution of the house property
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.