राज्यस्तरीय स्पर्धेत साक्षी, कल्पना, सिया यांना सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:52 AM2018-03-01T00:52:27+5:302018-03-01T00:52:41+5:30

रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत साक्षी चव्हाण, कल्पना मारकमे आणि सिया पायगुडे यांनी सुवर्णपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला. याच स्पर्धेत सिया पायगुडे ही बेस्ट अ‍ॅथलिट पुरस्काराचीदेखील मानकरी ठरली.

State level competition witness, Kalpana, Sia to gold | राज्यस्तरीय स्पर्धेत साक्षी, कल्पना, सिया यांना सुवर्ण

राज्यस्तरीय स्पर्धेत साक्षी, कल्पना, सिया यांना सुवर्ण

googlenewsNext

औरंगाबाद : रायगड येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत साक्षी चव्हाण, कल्पना मारकमे आणि सिया पायगुडे यांनी सुवर्णपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला. याच स्पर्धेत सिया पायगुडे ही बेस्ट अ‍ॅथलिट पुरस्काराचीदेखील मानकरी ठरली.
सिया पायगुडे हिने सबज्युनिअर गटातील ३00 मीटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. साक्षी चव्हाण हिने १00 मीटर धावण्यात सुवर्णपदक जिंकले, तर कल्पना मारकमे हिने लांब उडीत गोल्डन कामगिरी केली. त्याचप्रमाणे साक्षी चव्हाण, अर्पिता वाडकर, समीक्षा सप्ते, श्रावणी नन्नावरे यांचा समावेश असलेल्या औरंगाबादच्या मुलींच्या संघाने रिलेत सुवर्णपदक जिंकले. सिया पायगुडे हिने १00 मीटर धावण्याच्या शर्यतीतही रौप्यपदक जिंकले. मुलांच्या गटात लक्ष्मण पवार याने १00 मीटरमध्ये रौप्य, वेदांत पिसाळ याने लांब उडीत कास्यपदक पटकावले. पदकविजेत्यांना प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, पूनम नवगिरे, सुब्बा राव व अनिल निळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष व जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव फुलचंद सलामपुरे, रंजन बडवणे, प्राचार्य बाबूराव गंगावणे, प्राचार्या शशी नीलवंत आणि मोहन मिसळ यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
 

Web Title: State level competition witness, Kalpana, Sia to gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.