‘कोई पुकारे अल्ला तुझ को, कोही कहे भगवान'; सूफियानातून एकात्मतेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 02:54 PM2019-08-21T14:54:34+5:302019-08-21T14:55:49+5:30

जान दे देंगे लेकीन तिरंगा ना झुकने देंगे

'Somebody call Allah to you, some say God'; A message of solidarity from Sufiyana | ‘कोई पुकारे अल्ला तुझ को, कोही कहे भगवान'; सूफियानातून एकात्मतेचा संदेश

‘कोई पुकारे अल्ला तुझ को, कोही कहे भगवान'; सूफियानातून एकात्मतेचा संदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे लोकमत समाचार वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

औरंगाबाद :  ‘कोई पुकारे अल्ला तुझ को, कोही कहे भगवान, जिसके मन को जैसा भाए वो ले मान. हात खुले तो अल्ला अल्ला, हात जुड़े तो भगवान’, ‘हर दिन हो ईद के जैसा, हर रात हो दिवाली जैसी’ अशा शायरीतून एकता, एकात्मतेचा संदेश निजामी बंधूंनी दिला आणि तेवढ्याच जोशपूर्ण टाळ्यांचा कडकडाट करीत औरंगाबादकरांनीही त्यांचा संदेश ‘सर आँखो पर’ असे म्हणत दाद दिली. 

प्रसंग होता... ‘लोकमत समाचार’च्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘सूफी नाईट’ या मैफलीचा. प्रारंभी, महापौर नंदकुमार घोडेले, खा. इम्तियाज जलील, आ. अब्दुल सत्तार, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, सीआयएसएफचे डेप्युटी कमांडंट अमेरेंदु्र मन्ना, तसेच मुख्य प्रायोजक गादिया ग्रुपच्या संचालिका स्नेहा गादिया व सिद्धांत गादिया, प्रायोजक भाग्य विजयचे डॉ. विजय चाटोरीकर, सहप्रायोजक इरा स्कूलच्या रेखा गोरे, संदीप साऊंड अ‍ॅण्ड लाईटचे संदीप काळे, समृद्धी मल्टिसर्व्हिसेसचे मनोज थोरहट्टे व सिटी कट्टाचे निखिल भालेराव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. 

चांद निजामी, सोहराब निजामी व शादाब निजामी यांचे रंगमंचावर आगमन झाले. ‘बना के तुझ को मौला, खुद को बंदा कर लिया मैने, हो महेंगा या हो सस्ता अब तो सौदा कर लिया मैंने, अशी शायरी गात ईश्वर, अल्ला नाव वेगळे असले तरी ते एकच आहेत, असा संदेश देत सूफियाना अंदाजात ‘अल्लाह हू, अल्लाह हू’ हे गीत सादर करून औरंगाबादकरांची मने जिंकली. ‘बजरंगी भाई जान’ या चित्रपटात गायलेले ‘भर दे झोली मेरी या मोहम्मद, लौट के मैं न जाऊंगा खाली’ ही कव्वाली सादर होत असताना मध्येच चांद निजामी यांनी कव्वाली थांबवत म्हणाले की, ‘हर दिन हो ईद कै जैसा, हर रात हो दिवाली जैसी’, ‘मेरा मौला हो जिसपे मेहरबान वह हो गया, सत्यम शिवम सुंदरम’ अशी शायरी करीत शहरात नेहमी शांती, सद्भावना, एकता राहो, अशी प्रार्थना केली. 

यानंतर चांद निजामी यांचे पुत्र कामरान व गुलखान यांनी तरुणाईला साद घालत ‘चांदणी चाँद से होती हैं, सितारो से नही. मोहब्बत एक से होती हंै हजारो से नही’ असा शेर म्हटला आणि तेवढ्याच जल्लोषात ‘मेरे रश्के कमर तुने पहली नजर’ ही कव्वाली सादर केली. या कव्वालीला टाळ्यांची साथ मिळाली. सूफी गीत, कव्वाली, बॉलीवूडमधील गीत सादर करीत निजामी बंधूंनी सर्वांच्या मनाचा ठाव घेतला. मध्ये शास्त्रीय संगीताचा मिलाफ करीत त्यांनी गायनात बहार आणली. प्रत्येक गीताला, शेरोशायरीला प्रेक्षकही टाळ्या व शिट्यांनी दाद देत होते.  प्रास्ताविक ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव यांनी केले. 

जान दे देंगे लेकीन तिरंगा ना झुकने देंगे
‘खुद बेचेंगे तुझको ना बिकने देंगे, हम जमाने में तेरी शान ना रुकने देंगे, जान दे देंगे लेकीन तिरंगा ना झुकने देंगे’ अशी शायरी म्हटली व तेवढ्याच जोशात ‘हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए’ हे देशभक्तीपर गीत सादर केले. तेव्हा सर्वांची छाती अभिमानाने फुलून आली होती.

Web Title: 'Somebody call Allah to you, some say God'; A message of solidarity from Sufiyana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.