हातोड्याने वार करून पत्नीची केली हत्या; दोन चिमुकल्यांसमोर पतीचे क्रौर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:05 PM2020-02-15T18:05:51+5:302020-02-15T20:42:27+5:30

खून करुन पळालेल्या आरोपीला अंबडमध्ये (जि.जालना) पोलिसांनी अटक केली.

Smash his wife's body with a hammer; Husband's brutality in front of a two years child | हातोड्याने वार करून पत्नीची केली हत्या; दोन चिमुकल्यांसमोर पतीचे क्रौर्य

हातोड्याने वार करून पत्नीची केली हत्या; दोन चिमुकल्यांसमोर पतीचे क्रौर्य

googlenewsNext
ठळक मुद्देमोठ्या मुलाला घेऊन पतीने केले पलायन

औरंगाबाद: स्वयंपाक न केल्यामुळे दारुड्या नवऱ्याने २ वर्षाच्या चिमुकल्यासमोर पत्नीला लोखंडी हातोडा आणि लोखंडी टोच्याने संपूर्ण शरिरावर वार करीत हालहाल करुन ठार मारले. बीडबायपासवरील अरुणोदय कॉलनीत शनिवारी सकाळी हे भयंकर क्रौर्य उघडकीस आले. खून करुन पळालेल्या आरोपीला अंबडमध्ये (जि.जालना) पोलिसांनी अटक केली. चिकलठाणा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

राम काळे (२८,रा. वाकुळणी,ता. बदनापूर,जि. जालना) हा आरोपी पती असून जयश्री राम काळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. ६ वर्षापूर्वी राम आणि जयश्री काळे यांचा विवाह झाला. त्यांना २ वर्ष आणि ५ वर्ष वयाची दोन मुले आहेत. जयश्रीस तिच्या दोन्ही मुलासह वेगळे राहण्याची संमती तिच्या सासूने दिली होती. वाकुळणीतील  बांधकाम ठेकेदार सत्तारभाई हे  बीडबायपास परिसरातील अरुणोदय कॉलनीत एका बंगल्याचे बांधकाम करीत आहेत. तेथे पत्र्याच्या शेडमध्ये जयश्री दोन मुलांसह वॉचमन म्हणून अडिच महिन्यापासून राहात होती. 

मागील ८ दिवसापूर्वी राम काळे पत्नी कडे आला. तेव्हापासून पती-पत्नीत दारूवरून वाद होऊ लागले.  शुक्रवारी रात्री राम पुन्हा दारू पिऊन आला आणि त्याने बायकोला स्वयंपाक करण्याचे सांगितले. तिने स्वयंपाक करण्यास नकार दिल्याने त्यांच्यात जोरदार भांडण झाले. त्याने लोखंडी हातोडा, सिमेंट गोण्या उचलण्यासाठी वापरला जाणाऱ्या टोच्याने तिच्या डोक्यापासून ते तळपायापर्यंत विविध ठिकाणी घाव केले. त्यातच ती गतप्राण झाली. यानंतर तो मोठ्या मुलाला सोबत घेऊन तेथून पसार झाला. ठेकेदार सत्तारभाई हे सकाळी बांधकाम साईटवर गेले तेव्हा त्यांना वॉचमनच्या खोलीत निपचित पडलेल्या जयश्रीजवळ दोन वर्षाचा चिमुकला रडत असल्याचे दिसले. या घटनेची माहिती त्यांनी तात्काळ चिकलठाणा पोलिसांना कळविली.

Web Title: Smash his wife's body with a hammer; Husband's brutality in front of a two years child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.