‘खेलो इंडिया’ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतीक्षा सणसला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 12:40 AM2018-02-04T00:40:37+5:302018-02-04T00:40:45+5:30

औरंगाबादची प्रतिभावान अ‍ॅथलिट प्रतीक्षा सणस हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’च्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला. प्रतीक्षाने हे रौप्यपदक महाराष्ट्राला ४ बाय १00 रिलेत जिंकून दिले. महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून देण्यात प्रतीक्षा सणस हिच्यासह आभा साळुंखे, चार्वरी पुजारी, अवंतिका नारळे यांचा समावेश होता.

Silver at the 'Play India' Athletics Championship to Aurangabad | ‘खेलो इंडिया’ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतीक्षा सणसला रौप्य

‘खेलो इंडिया’ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत औरंगाबादच्या प्रतीक्षा सणसला रौप्य

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबादची प्रतिभावान अ‍ॅथलिट प्रतीक्षा सणस हिने नवी दिल्ली येथे सुरू असलेल्या ‘खेलो इंडिया’च्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक पटकावण्याचा पराक्रम केला. प्रतीक्षाने हे रौप्यपदक महाराष्ट्राला ४ बाय १00 रिलेत जिंकून दिले. महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून देण्यात प्रतीक्षा सणस हिच्यासह आभा साळुंखे, चार्वरी पुजारी, अवंतिका नारळे यांचा समावेश होता. औरंगाबाद येथील क्रीडा प्रबोधिनीत असणाºया प्रतीक्षा सणस हिला प्रशिक्षक सुरेंद्र मोदी आणि पूनम नवगिरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. प्रतीक्षा सणस हिने याआधी अनेक राष्ट्रीय स्पर्धेत पदकविजेती कामगिरी केली आहे.
तिने २0१४ मध्ये विशाखापट्टणम येथील आंतरजिल्हा राष्ट्रीय स्पर्धेत लांब उडीत रौप्यपदक जिंकले होते. २0१५-१६ मध्ये केरळ येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत ४ बाय १00 रिलेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. २0१५ मध्ये तिने पुणे येथे राज्यस्तरीय फेडरेशन स्पर्धेत ट्रायथलॉनमध्ये प्रथम आणि सबज्युनिअर गटातील लांबउडीत रौप्यपदकाची कमाई केली. २0१६ मध्ये तिने पुणे येथे सबज्युनिअर राज्यस्तरीय स्पर्धेत लांब उडीत गोल्डन कामगिरी केली. २0१७ मध्ये भोपाळ येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेत तिने ४ बाय १00 रिलेत कास्यपदक जिंकताना आपला विशेष ठसा उमटवला. या यशाबद्दल तिचे क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे आदींनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Silver at the 'Play India' Athletics Championship to Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.