दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतच उघडी राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:04 AM2021-04-18T04:04:56+5:302021-04-18T04:04:56+5:30

औरंगाबाद : कडक निर्बंधांचा सुधारित आदेश शनिवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी केला. या आदेशानुसार दुकाने सकाळी ...

The shops will be open from 7 am to 1 pm | दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतच उघडी राहणार

दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंतच उघडी राहणार

googlenewsNext

औरंगाबाद : कडक निर्बंधांचा सुधारित आदेश शनिवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जारी केला. या आदेशानुसार दुकाने सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत उघडी राहतील.

*भाजी मंडई सकाळी सात ते एक वाजेपर्यंत उघडी राहील.

*आठवडी बाजार भरविण्यावर बंदी राहील.

*पशुवैद्यकीय दवाखाने व कृषी संबंधित सेवा सकाळी सात ते एक वाजेपर्यंत सुरू राहतील.

*किराणा, भाजीपाला, फळे, डेअरी, बेकरी, मिठाईची दुकाने, खाद्यपदार्थांची दुकाने, गॅस सिलिंडर पुरवठा, गॅरेज, ऑटोमोबाइल दुकाने सकाळी सात ते एक वाजेपर्यंत सुरू राहतील

*वृत्तपत्रे, उपग्रह वाहिनीवरून प्रसारित होणारे चॅनल्स, अधिकृत अधिस्वीकृतीधारक पत्रकार 24 तास सुरू राहतील.

*सलून, उद्याने, मैदाने, चित्रपटगृहे, नाट्यगृहे बंद राहतील.

*रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांची विक्री पार्सल सुविधेद्वारे सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहील.

*पेट्रोल पंप नागरिकांसाठी सकाळी सात ते अत्यावश्यक सेवेसाठी 24 तास चालू राहतील.

*एक मे 2019 रोजी सकाळी सात वाजेपर्यंत हे आदेश लागू राहतील.

Web Title: The shops will be open from 7 am to 1 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.