Sanjay Raut on ST Strike: “एसटी कामगारांनी पगारावर समाधानी राहावं, संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 01:33 PM2021-11-18T13:33:01+5:302021-11-18T13:33:11+5:30

Sanjay Raut on ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखे आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

shiv sena sanjay raut react over st strike and said demands of workers are not in line with law | Sanjay Raut on ST Strike: “एसटी कामगारांनी पगारावर समाधानी राहावं, संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं”: संजय राऊत

Sanjay Raut on ST Strike: “एसटी कामगारांनी पगारावर समाधानी राहावं, संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं”: संजय राऊत

googlenewsNext

औरंगाबाद: गेल्या तीन आठवड्यापासून आंदोलन करणाऱ्या संपकरी कर्मचाऱ्यांवर (ST Strike) एसटी महामंडळाने कारवाई सुरू केली आहे. या संपावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत भाष्य केले असून, एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखे आहे, असे म्हटले आहे. 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. संजय राऊत यांनी औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात बोलताना एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपाबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत हळूहळू मार्ग निघतील. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनीही हेच सांगितले असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एसटी संपाबाबत विरोधी पक्षाला नाट्य पुरस्कार देऊ, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. 

शिवसेनेची कामगारांना सतत सहानुभूती आहे

एसटी कर्मचाऱ्यांनी पगार मिळतो आहे, त्यावर समाधानी राहावे. एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला आतापर्यंत २ हजार कोटी रुपये दिले आहेत. ही लहान गोष्ट नाही. आणि यापुढेही राज्य सरकार एसटी महामंडळाला पैसे देईल, असे सांगत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत आणि त्यासाठी तुम्ही तुमचे रक्त आटवणे हे भिंतीवर डोके आपटून घेण्यासारखे असते. शिवसेनेची कामगारांना सतत सहानुभूती आहे आणि ती यापुढेही राहील, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

संजय राऊत यांना खुले आव्हान

सोलापूर जिल्ह्याच्या कुर्डूवाडी येथील बस आगारातील कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तुम्ही म्हणता, या पगारात करा, आम्ही तुम्हाला मागितलंच काय आहे. मी माझा २५ हजार रुपये पगार संजय राऊत यांना देतो, त्यांनी स्वत:चे घर चालवून दाखवावे, माझे दुसरे काहीही मागणे नाही, असे एका कर्मचाऱ्याने संतप्तपणे म्हटले. संजय राऊत यांनी भावना दुखावणारी वक्तव्ये करू नयेत. असे बोलून आणखी आत्महत्या वाढवू नका. कामगार इकडे आत्महत्या करतोय, राज्यकर्त्यांनी जनाची नाही तर मनाची बाळगावी, असे म्हणत या कामगाराने आपला आक्रोश व्यक्त केला

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळातील कंत्राटी कामगारांनाही मोठा फटका बसला असून, २२९६ रोजंदारी कामगारांना सेवा समाप्तीची नोटीस महामंडळाकडून बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता कारवाई केलेल्या कामगारांची संख्या ४ हजार ३४९ वर गेली आहे. आतापर्यंत महामंडळाकडून २०५३ एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 

Web Title: shiv sena sanjay raut react over st strike and said demands of workers are not in line with law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.