सरसंघचालक मोहन भागवत औरंगाबादेत; १५ नोव्हेंबरपर्यंत विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत करणार मार्गदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 07:08 PM2021-11-11T19:08:39+5:302021-11-11T19:14:24+5:30

Sarsanghchalak Mohan Bhagwat सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ११ ते १५ नोव्हेंबरपर्यंत अग्रसेन भवन, सिडको येथे पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता व गोसेवा या विषयांवर देवगिरी प्रांतातील संघाच्या विविध संस्था- संघटनांच्या बैठका घेतील.

Sarsanghchalak Mohan Bhagwat in Aurangabad; Till November 15, he will provide guidance in the meetings of various organizations | सरसंघचालक मोहन भागवत औरंगाबादेत; १५ नोव्हेंबरपर्यंत विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत करणार मार्गदर्शन 

सरसंघचालक मोहन भागवत औरंगाबादेत; १५ नोव्हेंबरपर्यंत विविध संस्था, संघटनांच्या बैठकीत करणार मार्गदर्शन 

googlenewsNext

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ( RSS) संघटनात्मक कार्यासाठी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ( Mohan Bhagvat ) यांचे आज औरंगाबादेत आगमन झाले. ते ११ ते १५ नोव्हेंबरपर्यंत शहरात आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नामदेव मंदिराला व गुरुद्वाराला भेट दिल्यानंतर जालनामार्गे ते औरंगाबाद शहरात दाखल झाले. 

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ११ ते १५ नोव्हेंबरपर्यंत अग्रसेन भवन, सिडको येथे पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता व गोसेवा या विषयांवर देवगिरी प्रांतातील संघाच्या विविध संस्था- संघटनांच्या बैठका घेतील. या दौऱ्यात सरसंघचालक कुठेही माध्यमांशी बोलणार नसल्याची माहिती देवगिरी प्रांताचे संघचालक अनिल भालेराव, कार्यवाह हरीश कुलकर्णी यांनी दिली. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील भटके विमुक्त विकास परिषद, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह ६० महिला कार्यकर्त्या व भाजपचे काही कार्यकर्ते या बैठकीस निमंत्रित असल्याचे भालेराव यांनी सांगितले. १५ नोव्हेंबरला ते औरंगाबादहून विमानाने हैदराबादमार्गे कोलकात्याकडे रवाना होतील. सरसंघचालकांचा कुठलाही जाहीर कार्यक्रम होणार नसून, सर्व बैठका कोरोनाचे नियम पाळत निमंत्रित कार्यकर्त्यांसाठी असतील. १४ नोव्हेंबर रोजी संघाच्या विविध संस्था-संघटनांची समन्वय बैठक होईल. १४ रोजी गुरुवर्य लहूजी साळवे आणि १५ नोव्हेंबर रोजी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम होईल.

Web Title: Sarsanghchalak Mohan Bhagwat in Aurangabad; Till November 15, he will provide guidance in the meetings of various organizations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.