"वंचित'मधील आरएसएसच्या मंडळींना नकोय 'एमआयएम'सोबत युती'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 06:00 PM2019-09-09T18:00:50+5:302019-09-09T18:05:53+5:30

खासदार जलील यांचा खळबळजनक आरोप 

RSS activists in 'Vanchit Bahujan Aaghdi' do not want alliance with 'MIM' | "वंचित'मधील आरएसएसच्या मंडळींना नकोय 'एमआयएम'सोबत युती'

"वंचित'मधील आरएसएसच्या मंडळींना नकोय 'एमआयएम'सोबत युती'

googlenewsNext
ठळक मुद्देजर काँग्रेस सोबत जायचे होते तर आमच्यासोबत बोलणी का ?

औरंगाबाद : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आज एका पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीमध्ये काही मंडळी आरएसएसचे असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या मंडळींच्या सांगण्यावरून एमआयएमसोबत युती तोडण्याचा हा सगळा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. 

आमच्या पक्षाने वंचित कडे एकूण 74 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील फक्त आठ जागा आम्हाला देण्यात आले आहेत. प्रकाश आंबेडकर यांना एमआयएम पक्षाकडे वोट बँक नसल्याचे दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत आमच्याकडे किती वोट बँक आहे हे दिसून येणार आहे. वंचित मधील काही मंडळी मागील काही दिवसांपासून मला विलन ठरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्याच्या तोंडाला जे येईल ते सांगत आहे आम्हाला सुद्धा तोंड आहे याची जाणीव त्यांनी ठेवावी असा इशाराही त्यांनी दिला. 

आमच्यासोबत बोलणीचे नाटक 
यासोबतच वंचितला जर काँग्रेस सोबत जायचे होते तर आमच्यासोबत दोन महिन्यांपासून बोलण्याचे नाटक का केले असा प्रश्नही जलील यांनी उपस्थित केला आहे.

Web Title: RSS activists in 'Vanchit Bahujan Aaghdi' do not want alliance with 'MIM'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.