दहावीअंतर्गत मूल्यमापनासाठीच्या सर्वेक्षणात ७३३ शाळांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:05 AM2021-05-11T04:05:47+5:302021-05-11T04:05:47+5:30

कोरोना प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत, अकरावीत प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र सीईटी ...

Response of 733 schools in the survey for evaluation under X. | दहावीअंतर्गत मूल्यमापनासाठीच्या सर्वेक्षणात ७३३ शाळांचा प्रतिसाद

दहावीअंतर्गत मूल्यमापनासाठीच्या सर्वेक्षणात ७३३ शाळांचा प्रतिसाद

googlenewsNext

कोरोना प्रादुर्भावामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या आहेत, अकरावीत प्रवेशासाठी गुण देण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत एक स्वतंत्र सीईटी परीक्षा घ्यावी काय? हे विद्यार्थ्यांतून जाणून घेण्यासाठी लिंकद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून विद्यार्थ्यांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, तर दहावीच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली का, त्यासाठी शाळा तयार आहेत का, हे जाणून घेण्यासाठी सदर दुसरे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यात विभागीय मंडळाअंतर्गतच्या पाच जिल्ह्यांतील ७३३ शाळांनी प्रतिसाद रविवारी रात्रीपर्यंत नोंदविला आहे. मंगळवारी रात्री १२ पर्यंत हे सर्वेक्षण सुरू असून त्यात बहुतांश शाळा प्रतिसाद नोंदवतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

--

माहिती भरणाऱ्या माध्यमिक शाळांची संख्या

औरंगाबाद - २११

बीड- २१८

हिंगोली - १०५

जालना - २३

परभणी - १७६

---

सर्वेक्षण आज रात्री बारा वाजेपर्यंत

राज्यातील सर्व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांना अंतर्गत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना या सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी फाॅलोअप घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून मिळाल्या आहेत. दोन्ही सर्वेक्षण ११ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहील, असे शिक्षणाधिकारी व विभागीय परीक्षा मंडळाचे प्रभारी सचिव डाॅ. बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: Response of 733 schools in the survey for evaluation under X.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.