रेकॉर्डब्रेक मतदानाने उमेदवारांमध्ये धाकधूक; पदवीधर निवडणुकीचे मराठवाड्यात ६४.४९ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 06:09 PM2020-12-02T18:09:00+5:302020-12-02T18:14:59+5:30

महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशा पक्षीय स्वरूपाने या निवडणुकीत प्रचार केला गेला.

Record-breaking turnout threatens candidates; Record turnout of 64.49 per cent in Marathwada | रेकॉर्डब्रेक मतदानाने उमेदवारांमध्ये धाकधूक; पदवीधर निवडणुकीचे मराठवाड्यात ६४.४९ टक्के मतदान

रेकॉर्डब्रेक मतदानाने उमेदवारांमध्ये धाकधूक; पदवीधर निवडणुकीचे मराठवाड्यात ६४.४९ टक्के मतदान

googlenewsNext
ठळक मुद्दे३ डिसेंबर रोजी ६१ टक्के मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होणार आहे.३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख २७ हजारांच्या आसपास पदवीधर मतदारांनी मतदान केल्याचा अंदाज आहे.

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी प्राथमिक आकडेवारीनुसार आठ जिल्ह्यांतील ६४.४९ टक्के पदवीधर मतदारांनी मंगळवारी मतदानाचा हक्क बजावून निकालाची चुरस वाढविली आहे. २०१४ सालच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ‘रेकॉर्डब्रेक’ मतदान झाले आहे. ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

२०१४ मध्ये पदवीधर निवडणुकीसाठी ३९ टक्के मतदान झाले होते. यावेळी जास्त मतदान झाल्यामुळे मतमोजणी जास्त वेळ चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागच्यावेळी मतमोजणीच्या ४ फेऱ्या झाल्या होत्या. यावेळी ५६ टेबलवर मतमोजणीची व्यवस्था केल्यामुळे कमी वेळ लागेल, असा दावा यंत्रणा करीत आहे. ३ डिसेंबर रोजी ६१ टक्के मतदारांनी कुणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण, भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासह ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडी विरुध्द महायुती अशा पक्षीय स्वरूपाने या निवडणुकीत प्रचार केला गेला.  मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मतदानाचा उत्साह दिसला. अनेक शहरांमध्ये यंदा मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र दिसले.

शेवटच्या तासात वाढले मतदान
३ लाख ७३ हजार १६६ पैकी २ लाख २७ हजारांच्या आसपास पदवीधर मतदारांनी मतदान केल्याचा अंदाज आहे. ५० टक्के महिला पदवीधर आणि ६० टक्के पुरुष पदवीधर मतदारांनी मतदान केले. दुपारी ४ वाजेपर्यंत ५३.३० टक्के मतदान झाले होते. ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. या शेवटच्या तासात सुमारे ७ ते १२ टक्के मतदान वाढल्याचा अंदाज आहे. काही मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत मतदान सुरू होते.

जिल्हानिहाय टक्केवारी
औरंगाबाद ६३.५    जालना ६६.५४
परभणी ६७.६४    हिंगोली ६५.५८
नांदेड ६४.७    लातूर ६६.११
उस्मानाबाद ६६.९७    बीड ६२.०८
एकूण- ६४.४९

Web Title: Record-breaking turnout threatens candidates; Record turnout of 64.49 per cent in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.