लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 06:48 PM2020-10-05T18:48:46+5:302020-10-05T18:49:23+5:30

लग्नाचे अमिष दाखवून तसेच शारीरिक संबध ठेवले नाही, तर बदनामी करेल असे धमकावून एका पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी भावराव उर्फ प्रेम सोमीनाथ जाधव याच्याविरूद्ध खुलताबाद पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे.

Rape by showing lust for marriage | लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

लग्नाचे अमिष दाखवून बलात्कार

googlenewsNext

खुलताबाद : लग्नाचे अमिष दाखवून तसेच शारीरिक संबध ठेवले नाही, तर बदनामी करेल असे धमकावून एका पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी भावराव उर्फ प्रेम सोमीनाथ जाधव याच्याविरूद्ध खुलताबाद पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास गजाआड केले आहे.

याबाबत खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सीताराम मेहत्रे यांनी सांगितले की, आरोपी भावराव उर्फ प्रेम सोमीनाथ जाधव याने एका त्याच्या ओळखीतील घटस्फोटीत पिडित महिलेला लग्नाचे अमिष दाखविले आणि शारिरिक संबध ठेवले नाही, तर तुझी समाजात बदनामी करेल असे धमकावून ऑगस्ट २०१९ ते मे २०२० याकाळात आरोपीच्या खोलीवर तसेच म्हैसमाळ येथे वारंवार बलात्कार केला. याप्रकरणी पिडितेने दिलेल्या फिर्यादीवरून खुलताबाद पोलीसांनी आरेपीविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक भगवान झरेकर, दिनेश कोळी करीत आहे.

 

Web Title: Rape by showing lust for marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.